सावंतवाडी आठवडा बाजारात दोन विक्रत्यांमध्ये वाद

सावंतवाडी आठवडा बाजारात दोन विक्रत्यांमध्ये वाद

सावंतवाडी आठवडा बाजारात
दोन विक्रत्यांमध्ये वाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ः येथील मोती तलावाच्या काठी भरवल्या जाणाऱ्या मंगळवारच्या आठवडा बाजारात आज दोन छोट्या विक्रेत्यांमध्ये दुपारी वाद झाला. एक विक्रेता हातातातील काठी घेऊन महिला विक्रेत्याला मारहाण करण्यास गेला असता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हा प्रकार आवरला. यावेळी त्या विक्रेत्याला पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला.
येथील मोती तलावकाठी भरवला जाणारा मंगळवारच्या आठवडा बाजाराच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सध्या तो मोती तलावाकाठी भरत आहे. बाजार स्थलांतरावरून राजकीय वाद सुरू असतानाच आज आठवडा बाजारात गरमा गरमी पाहावयास मिळाली. या बाजारात छोटया विक्रेत्यांमध्ये या-ना त्या कारणावरून आपापसात वादावादी सुरूच आहे. आजच्या आठवडा बाजारात पालिकेसमोरील भागात वाहतूक पोलीस असलेल्या जागेपासून काही अंतरावरच भाजीविक्रेत्यांमध्ये वाद  झाला.
एका विक्रेता तरुण हातात काठी घेऊन एका महिला विक्रेत्याला मारण्यासाठी धावून आला. मात्र, तिथे वाहतूक पोलीस सुनील नाईक व पालिका आरोग्य विभागाचे निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी वेळीच हस्तक्षेप केला. संबंधित तरुणाने भाजीविक्रेते महिलेला मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. हा प्रकार भर बाजारपेठेत ग्राहकांच्या समोर घडत होता. त्यावर वाहतूक पोलीस नाईक यांनी त्या तरुणाला चांगलाच खाकी वर्दीचा हिसका दाखवला. त्यामुळे त्याने तेथून काढता पाय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com