चित्रकार ठोंबरेंनी रेखाटलेले तैलचित्र चेन्नईच्या राजभवनात

चित्रकार ठोंबरेंनी रेखाटलेले तैलचित्र चेन्नईच्या राजभवनात

96945
चेन्नई ः राज्यपाल आर.एन. रवी यांच्या हस्ते चित्रकार आनंद ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला.


चित्रकार ठोंबरेंनी रेखाटलेले
तैलचित्र चेन्नईच्या राजभवनात

राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण

सावंतवाडी, ता.१८ ः येथील जागतिक किर्तीचे चित्रकार आनंद ठोंबरे यांनी स्वामी विवेकानंद यांचे रेखाटलेले नऊ बाय सहा फुटाचे तैलचित्र चेन्नईच्या राजभवनात नुकतेच लावण्यात आले. चेन्नईचे राज्यपाल आर.एन.रवी यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
यावेळी आयपीएस आनंदराव पाटील, आयपीएस रवीराजन तिवारीएडीसी, आयपीएस विश्वेष शास्त्री यांच्या उपस्थितीत शाल आणि लक्ष्मीची प्रतिमा देऊन राज्यपाल आर.एन. रवी यांनी चित्रकार आनंद ठोंबरे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांची कन्या अनन्या ठोंबरे उपस्थित होत्या. चित्रकार श्री.ठोंबरे यांनी चितारलेले स्वामी विवेकानंद यांचे तैलचित्र कन्याकुमारीच्या केंद्रात लावले असून पॅरिसमधील प्रिंन्स अलिखान, ‘मातोश्री’वरील बाळासाहेब, माँसाहेब, धिरूभाई अंबानी, ठाण्यातील आनंद दिघे यांचे नुकतेच काढलेले तैलचित्र, कुडाळ, सावंतवाडी रेल्वेस्टेशनवरील मधु दंडवते यांची तैलचित्रे अद्यापही लक्षवेधी ठरलेली आहेत. पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हस्ते माटुंग्याच्या वेलिंगकर कॅालेजमधे ठोंबरे यांना नुकतेच सन्मानित केले होते. चेन्नईच्या शासनाकडून महाराष्ट्रातल्या जागतिक किर्तीच्या चित्रकाराचा बहुमान केल्याने ठोंबरेंच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com