जानवली ग्रामपंचायत निविदा जाहीर

जानवली ग्रामपंचायत निविदा जाहीर

जानवली ग्रामपंचायत निविदा जाहीर
कणकवलीः तालुक्यातील जानवली ग्रामपंचायतच्यावतीने नळ योजना दुरुस्तीसाठी निविदा जाहीर केली आहे. मान्यता प्राप्त ठेकेदारांना सुट्टीचे दिवस वगळून २१ एप्रिल पर्यंत निविदा सादर करावयाची आहे. गावातील नळ योजना दुरुस्तीसाठी दोन लाख ४२ हजार ६०२ रुपये पंधराव्या वित्तआयोगातून मंजूर केले आहेत. तीस दिवसाच्या आत काम पूर्ण करावयाचे आहे. ही निविदा २४ एप्रिलला सकाळी ११ वाजता उघडण्यात येणार आहे. असे, ग्रामपंचायती जानवली सरपंच यांनी कळवले आहे.
------
आशिये ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवलीः आशिये ग्रामपंचायतच्या वतीने विकास निविदा जाहीर केली आहे. यासाठी दरपत्रक मागविले आहे. मान्यताप्राप्त मक्तेदारांना २८ एप्रिल पर्यंत आपले दरपत्रक सादर करावे लागणार आहे. आशिये वरचीवाडी बौद्धवाडी अशोक कदम यांच्या घरालगत सार्वजनिक विहिर बांधकाम करणे ६ लाख २५ हजार १७ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. कामाची मुदत मार्च २०२४ पर्यंत आहे. अटी व शर्ती सविस्तर वर्णन ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे असे सरपंच ग्रामपंचायत आशिये यांनी कळवले आहे.
---------
तोंडवली बावशी विकास निविदा जाहीर
कणकवलीः तालुक्यातील तोंडवली - बावशी ग्रामपंचायतच्या वतीने विविध कामांसाठी विकास निविदा जाहीर केली आहे. बावशी शेळीचीवाडी जिल्हा परिषद शाळा शौचालय दुरुस्ती ५९ लाख ९३५ रुपये मंजूर केले आहेत. तोंडवली गावठाण जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे ५६ हजार ९३५ रुपये निधी मंजूर आहे. ग्रामपंचायत कार्यालय सुशोभीकरण २७ हजार १७० रुपये मंजूर केले आहेत. या कामासाठी एक महिन्याची मुदत असून मान्यता प्राप्त ठेकेदारांना २५ एप्रिल पर्यंत बंद लिपाफ्यात निविदा ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावे, असे तोंडवली बावशी सरपंच यांनी निवेदित म्हटले आहे.
--------
वरवडे ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवलीः तालुक्यातील वरवडे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध कामांसाठी सीलबंद निविदा नोंदणीकृत ठेकेदारांकडून मागविली आहे. वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र ते परबवाडी पर्यंत रस्ता डांबरीकरण आठ लाख रुपये निधी मंजूर आहे. वरवडे सुतारवाडी रस्ता कॉंक्रिटीकरण सात लाख रुपये निधी मंजूर आहे. वरवडे चव्हाण दुकान मागे कलमठ गणपती साना बांधणे १५ लाख रुपये मंजूर केले आहेत. लॅपटॉप खरेदीसाठी पन्नास हजार रुपये निधी तरतूद केली आहे. मान्यता प्राप्त ठेकेदारांना सुट्टीचे दिवस म्हणून २८ एप्रिलपर्यंत निविदा सादर करावयाची आहे, असे सरपंच ग्रामपंचायत वरवडे यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com