न्या. रामशास्त्री पुस्तके महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनेकडे

न्या. रामशास्त्री पुस्तके महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनेकडे

१९ (टुडे पान २ साठी)


-rat१८p२.jpg-
९६७४४
अभय ओक
--
न्या. रामशास्त्री पुस्तके महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनेकडे

शनिवारी कार्यक्रम ; न्यायमूर्ती अभय ओक यांची उपस्थिती

रत्नागिरी, ता. १९ ः महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेतर्फे लेखक, ॲड. विलास पाटणे लिखित न्या. रामशास्त्री प्रभुणे ही पुस्तके महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनांना प्रदान करण्याचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या प्रसंगी महाराष्ट्र वकील परिषदेचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील, उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. जयंत जायभावे उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी (ता. २२) सकाळी ११ वा. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील टाऊन हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन वकील परिषदेचे सदस्य ॲड. गजानन चव्हाण, ठाणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत कदम यांनी केले आहे.
शास्त्रानुसार न्याय होईल, निरपेक्ष न्यायाला नाती मंजूर नसतात, या नात्याने निवाडा करणारे न्या. रामशास्त्री यांनी मराठी दौलतीचे सर्वसत्ताधीश राघोबादादा यांना देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा देऊन निःपक्षपाती व निर्भिड न्यायदानाच्या मापदंड अधोरेखित केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ओक यांनी या पुस्तकाला दिलेल्या अभिप्रायात म्हटले आहे की, ‘‘रामशास्त्री कोण होते, त्यापेक्षा रामशास्त्री बाणा म्हणजे काय हे नव्या पिढीला कळणे महत्वाचे आहे ते सांगण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.’’
रामशास्त्री मराठी पुस्तकाचे प्रकाशन न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी केले होते. माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन न्यायमूर्ती महेश सोनक व गोव्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगंम यांच्या उपस्थितीत अलीकडेच गोव्यात झाले. आता हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनांना प्रदान करण्यात येणार असल्याने या पुस्तकाचे महत्व अधोरेखित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com