
राजापूर क्रीडा संकुलासाठी आणखी 50 लाख मंजूर
३ (टुडे पान १ साठी)
-rat१९p८.jpg ः
९७०३९
राजापूर ः क्रीडासंकूल उभारण्यात येणार असलेले परिसर.
-
राजापूर क्रीडा संकुलासाठी आणखी ५० लाख मंजूर
रायपाटणमध्ये उभारणी ; पाचपैकी दीड मिळाले, साडेतीन कोटीची प्रतीक्षा
राजापूर, ता. १९ ः तालुक्यातील रायपाटण येथे विविध सोयीसुविधांनीयुक्त तालुका क्रीडासंकुलाची उभारणी केली जाणार आहे. या संकुलाच्या उभारणीसाठी तालुका क्रीडासंकूल समितीचे अध्यक्ष आणि आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नातून तत्काळ ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे तालुका क्रीडासंकुलाच्या उभारणीच्या कामाला आता चालना मिळाली आहे.
तालुक्यातील सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल या संस्थेच्या रायपाटण येथील जागेमध्ये विविध सोयीसुविधांनीयुक्त तालुका क्रीडासंकूल उभारण्यात येणार आहे. या संकुलाच्या सुधारित ५ कोटीच्या प्रशासकीय अंदाजपत्रकाला शासनाकडून मान्यता मिळालेली आहे; मात्र पहिल्या टप्प्यातील १ कोटीचा निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया झाली आहे. मात्र, मंजूर झालेला निधी अपुरा ठरत आहे. त्यामुळे अतिरिक्त निधी मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी आमदार साळवी यांना सांगितले. राज्याच्या अधिवेशनादरम्यान आमदार साळवी यांना हा प्रस्ताव शासन स्तरावरून मंजूर करून घेतला. त्यामुळे संकुलासाठी तत्काळ ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. संकूल समितीची गत महिन्यामध्ये आमदार साळवी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेमध्ये तालुका क्रीडा संकूल उभारणीसंबंधित आढावा घेण्यात आला. या वेळी साळवी यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना तालुका क्रीडा संकुलासाठी उर्वरित साडेतीन कोटीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.
--
चौकट ः
अत्याधुनिक सुविधांचा समावेश
तालुका क्रीडा संकुलामध्ये ४०० मी. धावनपथ, प्रशासकीय इमारत व इनडोअर गेम हॉल, व्यायामशाळा, खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल मैदाने, बास्केटबॉल कोर्ट आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या सुविधांच्या उभारणीसह या ठिकाणी करण्यात येणारे विद्युतीकरण, पाणीपुरवठा, ड्रेनेज अंतर्गत रस्ते, तारेचे कुंपण व क्रीडा साहित्य आदी सोयीसुविधांच्या उभारणीचा खर्च नव्या अंदाजपत्रक आणि आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.