एमआयडीसीतील 13 कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसीतील 13 कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम
एमआयडीसीतील 13 कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम

एमआयडीसीतील 13 कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम

sakal_logo
By

२३ (पान २ साठी)


-rat१९p१४.jpg-
९७०५७

रत्नागिरी ः रत्नागिरी एमआयडीसीतील कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या १३ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम केल्याचे प्रमाणपत्र देताना उद्योगमंत्री उदय सामंत आदी.
---------

एमआयडीसीतील १३ कंत्राटी कर्मचारी कायम

रत्नागिरी, ता. १९ ः रत्नागिरी महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या १३ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. मागील काही दिवसांपासून अनेक कर्मचारी एमआयडीसीमध्ये कंत्राटी पद्धीतीने काम करत होते. सेवेत कायम करण्याची त्यांची मागणी होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एमआयडीसीने आज १३ जणांना शासकीय सेवेत कायम केल्याची नियुक्तीपत्रे प्रदान केली. निवड झालेल्या उमेदवारांमध्ये चालक, पंपचालक, निरीक्षक, शिपाई, लिपिक आदी पदांचा समावेश आहे. यासोबत राज्यभरातील एकूण ८८ जणांना कायम करण्यात आले आहे. या वेळी एमआयडीसीचे सीईओ बिपिन शर्मा, एचआर विभागाचे महाव्यवस्थापक तुषार मटकर आदी उपस्थित होते.