संक्षिप्त

संक्षिप्त

पान २ साठी, संक्षिप्त

शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृतीचे
भू गावांमध्ये बुधवारी प्रदर्शन
राजापूर ः तालुक्यातील बाईंगवाडी तरुण विकास मंडळ मुंबई यांच्यावतीने मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या दुर्मिळ प्रतिकृतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी (ता. १० मे) हे प्रदर्शन भू येथील आचार्य नरेंद्र देव विद्यामंदिर येथे सकाळी ११ ते सायं. ७ या कालावधीमध्ये विनामुल्य असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तके, मालिका, चित्रपटांमध्ये पाहिला जाणारी शिवकालीन शस्त्रास्त्रे जवळून पाहता येणार आहे. त्यांची माहिती जाणून घेण्याची सुवर्णसंधी राजापूरकरांना मिळणार आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन बाईंगवाडी तरुण विकास मंडळाने केले आहे.

राजापुरात आज लावणी स्पर्धा
राजापूर ः येथील रिक्षा सेना चालक मालक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी श्री सत्यनारायण महापूजा गुरुवारी (ता. २०) होणार आहे. त्यानिमित्त रात्री ८ वा. राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धांचे (सोलो) आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त सायं. ५ ते ७ रिक्षासेना चालक मालक महिला संघटनेच्या वतीने हळदीकुकूं समारंभ, ६ वा. भजनसंध्या), सायं. ७.३० वा. आमदार राजन साळवी यांच्या हस्ते सत्कार, रात्री ८ वा. महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

ओणीत सोमवारी शेतकरी मेळावा
राजापूर ः राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे सोमवारी (ता. २४) तालुक्यातील ओणी येथील नूतन विद्यामंदिरच्या सभागृहामध्ये भव्य शेतकरी-सभासद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. होणार्‍या या मेळाव्यामध्ये रेशीम शेतीतज्ञ रमेश हांदे, महेश सावंत, रत्नागिरीतील स्टार रोजगार प्रशिक्षण संस्थेचे प्रसाद कांबळे यांच्यासह प्रगतशील रेशीम शेतकरी वासुदेव घाग, अमर खामकर, राजाराम पाटेकर, सुधीर पालकर, हनुमंत विचारे रेशीम शेतीसंबंधी मार्गदर्शन करणार आहे.

मांडकीत निवारा शेडची मागणी
चिपळूण ः तालुक्यातील मांडकी गावातील कोष्टेवाडी, भटवाडी या ठिकाणी एसटी बससाठी प्रवासी निवारा शेड उभारण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व विद्यार्थीवर्गातून केली जात आहे. मांडकी गावामध्ये पहिली प्रवासी निवारा शेड बांधण्यात आली होती. ती कौलारू व जांभा दगड खांबावर उभी होती. काही वर्षांपूर्वी झालेल्या वादळ, पावसात ती शेड पडली. तेव्हापासून आजपर्यंत ती शेड उभारण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत. शेड नसल्याने स्थानिक ग्रामस्थ, वयोवृद्ध व्यक्ती, महिला तसेच विद्यार्थी यांना भरउन्हात रस्त्यावर उभे राहून एसटीची वाट पाहावी लागत असून सर्वांचेच हाल होत आहेत. या रस्त्याने चिपळूण पालवण, चिपळूण तुरंबव व्हाया वहाळ, चिपळूण मुर्तवडे, चिपळूण भातगाव-आबलोली अशा अनेक एसटीच्या फेऱ्या सुरू असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी येथे निवारा शेड उभारण्याची मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com