गडनदीपुलावरील पुलाचे काम युद्धपातळीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडनदीपुलावरील पुलाचे काम युद्धपातळीवर
गडनदीपुलावरील पुलाचे काम युद्धपातळीवर

गडनदीपुलावरील पुलाचे काम युद्धपातळीवर

sakal_logo
By

३४ (पान ५ साठी)


- rat१९p२३.jpg-
९७०८६
रत्नागिरी ः गडनदी पुलावर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू.
- rat१९p२४.jpg-
९७०८७
रत्नागिरी ः दोन्ही बाजूंनी भरावाचे काम सुरू आहे.
--
गडनदी पुलावरील पुलाचे काम युद्धपातळीवर

चौपदरीकरण ; दोन्ही बाजूने भरावाचे काम वेगाने

संगमेश्वर, ता. १९ ः मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्याच्या प्रवेशद्वारावर आरवली येथील गडनदी पुलावर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या पूर्व बाजूला उभारलेल्या महामार्गावरील या पुलाचे काम आता अंतिम टप्प्याकडे आहे. पुलावर गर्डर चढवण्याचे काम पूर्ण झाले असून, दोन्ही बाजूंनी भरावाचे काम मोठ्या मशिनरीच्या साह्याने युद्धपातळीवर सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टरमधून चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाची हवाई पाहणी केली. महामार्गाच्या आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड या पट्ट्यातील रखडलेल्या कामाने वेग घेतला आहे. दशकभरापूर्वीच ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती करण्यात येऊन त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. या पुलाच्या बाजूलाच आता चौपदरी महामार्गावरील नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गर्डर चढवण्याचे काम पूर्ण झाले असून, आरवली बाजारपेठ तसेच चिपळूणमधील खेरशेतच्या बाजूने पुलाला जोडणारा भराव टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
------
उड्डाणपुलाचे कामही प्रगतीपथावर
राष्ट्रीय महामार्गाला आरवली येथे करजुवे-माखजन ते कुंभारखणी–पाचांबे राजीवलीकडे जाणारा रस्ता छेदून जात असल्याने संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे उड्डाणपूल उभारावा लागला आहे. सद्यःस्थितीत या पुलाचे थंडावलेले कामदेखील वेगाने सुरू आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडचे काम करण्यात आले आहे. सध्या या सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले नसले तरी कशीबशी वाहने जाऊ शकतील, इतके काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी आरवली बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या सर्व्हिस रोडला गटाराची व्यवस्था न केल्यास व्यापाऱ्यांना पाणी तुंबण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.