
गोळवणमध्ये शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप
swt१९२४.jpg
९७१४२
गोळवणः येथे आयोजित शिबिरात लाभार्थ्यांना विविध दाखले उपलब्ध करून देण्यात आले.
गोळवणमध्ये शिबिरात दाखल्यांचे वाटप
मालवण : गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायत व सद्गुरू समर्थ महा-ई सेवा केंद्र, वराड यांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित शिबिरात लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले एकाचवेळी उपलब्ध करून देण्यात आले. गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायत कार्यालयात आज शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत अपंग, निराधार परितक्ता, विधवा लाभार्थ्यांना उत्पन्न, हयात दाखले प्रमाणपत्र एकाच वेळी उपलब्ध करून देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. कार्यक्रमास पेंडूरचे मंडळ अधिकारी उमेश राठोड, महा-ई सेवा केंद्र वराडचे केंद्र चालक राजन माणगावकर व त्यांचे सर्व सहकारी, सरपंच सुभाष लाड, उपसरपंच साबाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य शरद मांजरेकर, मेघा गावडे, प्राजक्ता चिरमुले, तलाठी सी. एम. कांबळे, हेदुळ कोतवाल प्रमोद गरुड, डिकवल येथील मनोहर गावडे, एलआयसीचे प्रतिनिधी श्री. नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी बाळाराम परब, रामकृष्ण नाईक, श्रीमती करुणा राणे, दत्ताराम परब आदी उपस्थित होते. या शिबिरात गोळवण, कुमामे, डिकवल येथील सुमारे १२५ लाभार्थ्यांचे उत्पन्नाचे दाखले काढण्यात आले.
................
हडी येथे मेमध्ये धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्लेः हडी येथील मेतर, लोणे, मेथर व कालमेथर कुटुंबीयांच्या मंदिर आणि पाषाणमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना २ व ३ मे रोजी करण्यात येणार आहे. २ मे रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, पाषाण मूर्तीचे कालिकामाता मंदिरापासून ते मूळपुरुष मंदिरापर्यंत मिरवणुकीने आगमन, दुपारी पाषाण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, ३ मे रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, भजन व दुपारी महाप्रसाद होणार आहे. उपस्थित रहाण्याचे आवाहन मेतर, लोणे, मेथर व कालमेथर परिवारांकडून केले आहे. देविदास कालमेथर यांच्याशी संपर्क साधावा.
..................