सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

२४ (पान ३ साठी)
- rat१९p१८.jpg-
९७०७४
रत्नागिरी ः काँग्रेस आघाडीचे पदाधिकारी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देताना
-------
श्री सेवकांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करा

काँग्रेस आघाडीतर्फे मागणी ः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

रत्नागिरी, ता. १९ ः ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात अनेक श्रीसेवकांचा नाहक बळी गेला. मंत्री, राजकीय नेते मंडपात मात्र सामान्य जनता उन्हात होती. या सर्व गोष्टींची सखोल चौकशी करून जे शासकीय अधिकारी, आयोजक, मंत्री, सरकार याला जबाबदार आहेत, त्यांच्यावर त्वरित सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीच्या शिष्टमंडळातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
नवी मुंबई, खारघर येथे १६ एप्रिलला महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित करणे आवश्यक होते. दुपारी तप्त उन्हात तेही खुल्या मैदानात कार्यक्रम ठेवल्यामुळे ८ ते ९ लोकांना उष्माघाताने प्राण गमवावे लागले. या कार्यक्रमासाठी जर सरकारने १२ ते १४ कोटी रुपये मंजूर केले होते, तर नक्कीच बंदिस्त मोठ्या हॉलमध्ये पुरस्कार वितरण समारंभ घेणे गरजेचे होते. १ हजार गाड्या लोकांना आणण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या, तर रखरखीत उन्हात पेंडॉल का घालण्यात आला नाही. जाणुनबुजून हा कार्यक्रम मोकळ्या मैदानात ठेवण्यात आला का असा प्रश्न निर्माण झाला आहे. निरपराध श्री सेवकांचे बळी गेले ते उष्णतेचे की नियोजनशून्य कारभाराचे असा प्रश्न पडला आहे. मंत्री, राजकीय नेते मंडपात सामान्य जनता उन्हात. या सर्व गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे. अशी शिष्टमंडळाने मागणी केली. या वेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला प्रतिनिधी रूपाली सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, अॅड. अश्विनी आगाशे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, महिला तालुकाध्यक्ष शमिका नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com