वाफोली धरणानजीक पुलाच्या जोडरस्त्याच्या कामास प्रारंभ

वाफोली धरणानजीक पुलाच्या जोडरस्त्याच्या कामास प्रारंभ

swt1928.jpg
97170
वाफोलीः येथे पुलाच्या जोडरस्त्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

वाफोली धरणानजीक पुलाच्या
जोडरस्त्याच्या कामास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ः बांदा-दाणोली रस्त्यावरील वाफोली धरणाजवळ नव्याने बांधकाम केलेल्या पुलाच्या जोडरस्त्याचे काम आजपासून सुरू करण्यात आल्याने वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे. यासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी पुलाच्या मधोमध बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
श्री. आईर यांनी यासंदर्भात बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले होते. निवेदनात म्हटले होते की, वाफोली धरणाजवळ नाबार्ड योजनेंतर्गत ७५ लाख रुपये खर्चून पूल उभारण्यात आले आहे. गतवर्षी मार्च अखेरीस पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. पुलाच्या जोडरस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम अंदाजपत्रकात समाविष्ट असूनही ठेकेदार काम करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. यामुळे रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहनचालकांना गाडी चालविताना कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी छोटेमोठे अपघात झाले असून खड्डेमय मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या आठ दिवसांत उर्वरित काम पूर्ण करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यावेळी बांधकामच्या अधिकाऱ्यांनी आईर यांची भेट घेत तत्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आजपासून कामास प्रारंभ करण्यात आला. आंबोली ते गोवा जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com