हुंबरठ येथे महीला ग्रामसभेत विकास कामांवर चर्चा

हुंबरठ येथे महीला ग्रामसभेत विकास कामांवर चर्चा

kan201.jpg
97225
हुंमरठः येथील ग्रामपंचायत कार्यालयात महीला सभेत बोलताना स्नेहा महाडिक.
-----------
हुंबरठ येथे महीला ग्रामसभेत
विकास कामांवर चर्चा
कणकवली, ता. २०ः गावातील महीलांनी ग्रामपंचायतीच्या सभामध्ये उपस्थित राहून विकास कामात सहभाग घ्यावा. महिला सक्षम झाल्यास कुटूंब सक्षम होईल असे प्रतिपादन विकास प्रबोधिनी संस्थेच्या स्नेहा महाडिक यांनी केले आहे.
हुंबरठ ग्रामपंचायत कार्यालयात महीला ग्रामसभा घेण्यात आली. या सभेला गावातील महीलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. आपला विकास, ग्रामसभेचे महत्व, महिला सक्षम याविषयी महत्व पटवून देण्यात आले. यावेळी सरपंच मनीषा गुरव, ग्रामसेवक वैभव ठाकूर, महीला बचत गटाच्या वैदेही गुरव, सदस्य शरीफआ काझी, रिया पांचाळ,दीपा लोहार, स्वप्नाली जाधव, नसरीन शेख, अंगणवाडी सेविका अमीना काझी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन कराताना सौ. महाडिक म्हणाल्या, हुंबरठ गावातील विकास कामे गतीने व्हावीत. या कामामध्ये पारदर्शकता असावी याची जबाबदारी गावातील महीलांनी घेतली पाहीजे. महीलांनी प्रत्येक ग्रामसभेला उपस्थितीत राहुन कामाजातील निर्णयात सहभागी झाले पाहीजे. गावचा विकास हा महीलांच्या हाती असला पाहीजे. गावातील पाणी योजना, रस्ते, पायवाटा आणि वैयक्तीक लाभाच्या योजना समजुन घेतल्या पाहीजेत. गावातील २४ महीला बचत गट आहेत. या गटांना ग्रामपंचायतीच्या माद्यमातून सहकार्य मिळायला हवे. बचत गटाच्या माद्यमातून महीलांची व्यवसाय करायला हवा. गावातील कुटूंबाना रोजच्या जिवणात लागणाऱ्या वस्तून बचत गटाच्या माध्यमातून पुरवठा केला तर बचत गटांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. यावेळी सरपंच, ग्रामसेवक यांनी ही मार्गदर्शन केले. विविध विकास कामांचे ठराव ही सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com