आमदार राजन साळवी यांनी घेतली जखमीच्या पालकांची भेट

आमदार राजन साळवी यांनी घेतली जखमीच्या पालकांची भेट

rat२०२१.txt

बातमी क्र. .२१ (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२०p२२.jpg ः
९७२८०
साखरपा ः सागर वैद्य याच्या पालकांची विचारपूस करताना आमदार राजन साळवी.
--
आमदार साळवींकडून जखमीच्या पालकांची भेट

साखरपा, ता. २० ः राजापूर विधानसभा मतदार संघातील आमदार राजन साळवी यांनी सागर वैद्य यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले. या वेळी जिल्हाध्यक्ष विलास चाळके उपस्थित होते.
साखरपा येथे मंगळवारी झालेल्या युवकावरील हल्ल्याप्रकरणी आमदार राजन साळवी यांनी जखमी सागर वैद्य याच्या घरी जाऊन त्याच्या पालकांची भेट घेतली. साळवी यांनी त्यांच्याशी चर्चा करून सागर याच्या तब्येतीची चौकशी केली. सागर याच्यावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींचा पाठपुरावा करून सागर यास न्याय देण्याचे आश्वासन देत या प्रकरणी पोलिसांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या वेळी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विलास चाळके, महिला आणि बालकल्याण जिल्हा परिषद माजी अध्यक्षा रजनी चिंगळे, भडकंबा उपसरपंच बापू शिंदे, शेखर कोलते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
-
बॅनर गायब

दरम्यान, बुधवारी (ता. १९) एसटी स्टँड इथे झालेल्या निषेधादरम्यान हल्ल्यातील संशयिताच्या बॅनरबाजीचा मुद्दा पोलिसांकडे मांडण्यात आला. गावात ठिकठिकाणी संशयित आरोपीने आपले विविध बॅनर लावले असल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामपंचायतीस सांगून हे सर्व बॅनर काढून टाकण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते. आज गावात, बाजारपेठ, कोंडगाव चौक इथून सर्व बॅनर गायब झाल्याचे निदर्शनास आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com