agriculture
agriculturesakal

Kharif Crop : रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामात 80 हेक्टरवर लागवड

कृषी आयुक्तांकडून जिल्ह्याचा आढावा ; काम न करणाऱ्यांवर कारवाई

रत्नागिरी : खरीप हंगामात कोकणासाठी ४ लाख १६ हजार हेक्टरवर लागवड होणार असून त्यात रत्नागिरी जिल्ह्यात ८० हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. अलनिनोचा प्रभावामुळे पाऊस लांबल्यास कृषी विभागाकडून नियोजन करावे. १० मे पूर्वी तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत बियाणे पोच करावीत, अशा सूचना राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

तसेच हंगामात काम न करणारे कर्मचारी, अधिकाऱ्‍यांवर कडक कारवाई करण्याची तंबीही दिली आहे.दापोली येथील कोकण कृषी विद्यापिठात कोकण विभागीय खरीपपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, फलोत्पादन संचालक केलास मोटे, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील,

मृद व जलसंधारण संचालक रवींद्र भोसले, संशोधन संचालक संजय भावे, डॉ. प्रमोद सावंत, रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुऱ्हाहाडे यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे कृषी अधीक्षक उपस्थित होते.ठाणे येथील कोकण विभाग कृषी सहसंचालक यांनी २०२२-२३ अंतर्गत कोकणातील पाचही जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

त्यानंतर खरीप हंगाम २०२३ च्यादृष्टीने कृषी विभागाचे शेतकऱ्‍यांसाठी कोणकोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबविणार याबाबत मार्गदर्शन केले. पारंपरिक भात बियाण्यांचे संवर्धन प्रात्यक्षिकाद्वारे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त नाचणी, वरी यासारख्या पिकांचे प्रात्यक्षिकाद्वारे बियाणे उपलब्ध करून देऊन क्षेत्र व उत्पादकता वाढविणे, खते व बियाण्यांचे व्यवस्थित नियोजन करणे,

फळबाग व लागवडीद्वारे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर टाकणे, प्रक्रिया उद्योजगाद्वारे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी श्री. चव्हाण यांनी दिल्या. लागवडीसाठी कोकण कृषी विद्यापिठाने निश्‍चित केलेल्या हायब्रीड बियाण्यांचा वापर शेतकर्‍यांनी करावा यासाठी प्रोत्साहन द्यावे. जेणेकरुन खासगी बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादनावर परिणाम झाला असे होणार नाही.

खतांच्या विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत यादृष्टीने अधिकार्‍यांनी सतर्क राहिले पाहिजे. त्यासाठी पॉस मशिनवरच खरेदी केली जावी अशा सूचना विक्रेत्यांना द्या. रत्नागिरी व सिंधुदुर्ग फलोत्पादन जिल्हा आहेत.

त्यामुळे मनरेगा आणि भाऊसाहेब फुंडकर योजनेतून जास्तीत जास्त फळ लागवड करून घ्यावी. प्रत्येक कृषी सहाय्यकाने १५ हेक्टर लागवड शेतकर्‍यांकडून करुन घ्यावी असे चव्हाण यांनी सांगितले. कोकण विभागाला खरीप हंगामात १० हजार हेक्टरवर फळ लागवडीचे उद्दिष्ट दिले आहेत.

त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना श्री. मोते यांनी दिल्या.

  • यंदा १० टक्केने उद्दिष्ठ वाढवले

  • विद्यापीठ-कृषी विभागाने एकत्र काम करण्याची सुचना

  • शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढवा

  • आंबा पुनरूज्जीवनावर भर द्या


जिल्हा क्षेत्र (हेक्टर)
ठाणे ५९ हजार
पालघर १ लाख ४ हजार
रायगड १ लाख ६ हजार
रत्नागिरी ८० हजार
सिंधुदुर्ग ६६ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com