रत्नागिरी- वयाएवढी रक्कम सामाजिक संस्थांना दिली देणगी

रत्नागिरी- वयाएवढी रक्कम सामाजिक संस्थांना दिली देणगी

काही सुखद---लोगो

फोटो ओळी
-rat२०p२०.jpg- :KOP२३L९७२५३ प्रा. उदय बोडस, सौ. साधना बोडस


वयाएवढी रक्कम सामाजिक संस्थांना दिली देणगी

बोडस दांपत्याचा पायंडा ; पार्टी, केकऐवजी सामाजिक कार्यासाठी मदत
रत्नागिरी, ता. २० : वयाची साठ पार करताना रत्नागिरीतील प्रसिद्ध प्रा. सीएमए उदय बोडस आणि सौ. साधना बोडस दांपत्याने ७ सामाजिक संस्थांना साठ हजार रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. वाढदिवशी केक, पार्टी, मित्र-मैत्रिणींचे गेट टुगेदर, हॉटेलिंग, नवीन खरेदी किंवा लांबचा प्रवास असा कोणताही खर्च न करता आपल्या वयाच्या पूर्ण झालेल्या वर्षाइतकी रक्कम त्यांनी सामाजिक कार्यासाठी दिली. त्यांनी हा आगळा पायंडा पाडला असून त्यांचा हा आदर्श समाजाने नक्कीच घेण्यासारखा आहे.
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून (सन १९७८) ते आजपर्यंत ४५ वर्षे एकमेकाला साथ देणाऱ्या निवृत्त प्राध्यापक उदय बोडस व पत्नी सौ. साधना यांनी आपली वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्याची साठीशांत आगळ्या प्रकारे साजरी केली. दोघांच्या वयात अवघे दोन दिवसांचे अंतर आहे. उदय बोडस यांचा जन्म २० एप्रिल १९६३ चा तर सौ. साधना जोशी- बोडस यांचा जन्म २२ एप्रिल १९६३ चा. दोघांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येऊन स्वकष्टाने दोघांनी यश मिळवले आहे.
वर्गमित्रच असल्याने दोघांचाही मित्रपरिवार मोठा आहे. सामाजिक कामामुळे जनसंपर्क भरपूर आहे, तरीही दोघांनी आपला हीरक महोत्सवी वाढदिवस आगळ्या प्रकारे साजरा करायचा ठरवला आणि तो संकल्प प्रत्यक्षात उतरवला. केक, पार्टी, मित्र-मैत्रिणींचे गेट टुगेदर, हॉटेलिंग, नवीन खरेदी किंवा लांबचा प्रवास असा कोणताही खर्च न करता आपल्या वयाच्या पूर्ण झालेल्या वर्षाइतकी रक्कम ६० हजार रुपये ही सामाजिक कार्यासाठी खर्च दोघांनी करायचे ठरवले आणि ती रक्कम दान केली.
गेली १० वर्षे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आजपर्यंत दोघांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५ व्यक्ती व ८ सामाजिक/ शैक्षणिक संस्था यांना पुरस्कार आणि देणग्या या मार्गाने ४ लाख ८६ हजार रुपये इतकी रक्कम वितरीत केली आहे. या वेळी हीरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग, मतीमंद, निराधार मुले, महिला आणि वृद्ध यांच्यासाठी काम करणाऱ्या ७ सामाजिक व स्वयंसेवी संस्थाना मिळून ६० हजार रुपये देणगी रूपाने देण्याचे दोघांनी ठरवले. त्यासाठी सदर संस्थांची निवड त्यांनी स्वत: केली. मार्च महिन्यात खात्याची माहिती मागवली. ५ ते १२ एप्रिल या कालावधीत ही रक्कम त्यांनी खात्यात वर्ग केली. कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट देणगी देऊन दोघांनी सबंधित संस्थाना सुखद धक्का दिला. दोघांनी हा आगळा वेगळा हीरक महोत्सव अशा प्रकारे साजरा करून नवा पायंडा पाडल्याबद्दल संबंधित संस्थांनी त्यांचे आभार मानले.

चौकट १
या संस्थांना दिली मदत
स्नेहदीप संस्थेचे इंदिराबाई बडे कर्णबधीर विद्यालय दापोली, ग्रामआधार स्वयंसेवी संस्था संचालित जीवन ज्योती विशेष शाळा व मतीमंद पुनर्वसन केंद्र, शृंगारतळी – गुहागर, सांदिपनी गुरुकुल कुडवली- ताम्हाने, संगमेश्वर, जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटनेचे अभ्यंकर निरीक्षणगृह, बालगृह रत्नागिरी, (कै.) श्रीमती जानकीबाई (अक्का) तेंडूलकर महिलाश्रम लांजा, स्वस्तिक फौंडेशन संचालित दिवीचा वृद्धाश्रम असलदे, कणकवली आणि जीवन आनंद संस्था संचालित संविता वृद्धाश्रम, पणदूर कुडाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com