विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव
kan२०२.jpg
९७३२१
साकेडी : येथील कार्यकमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा
समाजभूषण पुरस्काराने गौरव
कणकवली, ता. २० : तालुक्यातील साकेडी येथील महामाता भिमाई आंबेडकर स्मारक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम झाला. यात विविध क्षेत्रातील १७ मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भिमाई स्मारकाचे संस्थापक आणि द बुद्धिस्ट सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष संदेश जाधव (साकेडीकर) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्यामध्ये त्यांच्या मातोश्री भिमाई यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला जात असल्याची माहिती संदेश जाधव यांनी दिली. कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते विविध मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये आर टी कांबळे (मुंबई), संजय जाधव (खेड), दत्ताराम कांबळे उर्फ जनीकुमार, मनाली वंजारी, सीम जाधव, रिना राणे, भिकाजी जाधव, सिध्दार्थ जाधव, समिधा वारंग, अरूण गाडे, डॉ. चंद्रकांत राणे, सिध्दार्थ तांबे, तानाजी कांबळे, राजेश कांबळे, दिपक कांबळे, विश्वनाथ कदम, राजेश पुरूषोत्तम कदम आदींचा समावेश आहे. यावेळी अनिल असलदेकर, बाळकृष्ण कोकीसरेकर, डॉ. सुहास पावसकर, संतोष ताम्हणेकर, प्रकाश देवरूकर उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.