आरजीपीपीएल मधून 700 मेगावॉट वीजनिर्मिती

आरजीपीपीएल मधून 700 मेगावॉट वीजनिर्मिती

४६ (पान ३ साठी)

आरजीपीपीएल मधून ७०० मेगावॉट वीजनिर्मिती

केवळ तीन दिवस चालणार ; प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय

गुहागर, ता. २१ : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. परंतु, राज्य किंवा केंद्र सरकारकडून अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, येथील प्रकल्प व्यवस्थापन विजेच्या मागणी नुसार वीज निर्मिती करत आहे. सोमवारपासून प्रकल्पातून ७०० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू केली आहे. ही वीज निर्मिती तीन दिवस चालणार आहे.
तालुक्यातील अंजनवेल याठिकाणी उभारण्यात आलेला एनरॅानचा दाभोळ वीज प्रकल्प आणि आताचा रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प १९९५ साली सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या काळात वादग्रस्त ठरला होता. सध्या एनटीपीसी या कंपनीतील प्रमुख भागधारक आहे, तर राज्य वीज कंपनीचे भागभांडवल खूपच कमी आहे. गॅसवर चालणारा हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. किफायतशीर दराने अखंडित गॅस पुरवठा झाल्यास या प्रकल्पातून कमी दराने वीजनिर्मिती होऊ शकते. त्यासाठीच केंद्राकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. एकीकडे विजेची वाढती मागणी आणि दुसरीकडे कोळशाचा तुटवडा लक्षात घेता नैसर्गिक वायूवरील हा प्रकल्प सुरू करणे योग्य राहील, असे केंद्रीय ऊर्जा विभागाचेही मत आहे. याबाबत केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली देशातील गॅस आधारित वीज प्रकल्पांशी संबंधित एक बैठकही काही महिन्यांपूर्वी पार पडली होती.
वीज दरवाढीमुळे तत्कालीन फडणवीस सरकारने प्रकल्पातून वीज घेणे बंद केले होते. त्यानंतर कंपनीने रेल्वेबरोबर ५०० मेगावॉटचा करार करून प्रकल्प सुरू ठेवला. सरकारने नैसर्गिक वायूवरील अनुदान बंद केल्याने वीजनिर्मिती महागडी झाली. परिणामी रेल्वेबरोबरचा करारही संपुष्टात आला. महागड्या दरामुळे नवीन वीज खरेदी करार झाला नाही. भाजप-शिवसेना युतीच्या काळात एन्रॉनच्या नावाने वादग्रस्त ठरलेला या प्रकल्पात आतापर्यंत अनेक विघ्ने आली आहेत. आधी दाभोळ वीज प्रकल्प हे नाव असलेला हा प्रकल्प आता रत्नागिरी वीज प्रकल्प नावाने ओळखला जातो. दरम्यान, ऑगस्ट २०२२ पासून प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती होत नाही. मध्यंतरीच्या काळात व्यवस्थापनाने दोन दिवस वीज निर्मिती करत ५०० मेगावॉट वीजनिर्मिती केली होती. सोमवारी प्रकल्पातील गॅस व स्टीम टरबाईनमधून ७०० मेगावॉट वीजनिर्मिती केली करण्यात आली.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com