-जिल्ह्यांतील 2 समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रकुटीला मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-जिल्ह्यांतील 2 समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रकुटीला मान्यता
-जिल्ह्यांतील 2 समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रकुटीला मान्यता

-जिल्ह्यांतील 2 समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रकुटीला मान्यता

sakal_logo
By

१४ (टूडे पान ३ साठी, मेन)


- rat२१p५.jpg-
97527
रत्नागिरी ः आरे-वारे किनारा
----------
जिल्ह्यांतील दोन समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रकुटीला मान्यता

एमटीडीसीचा प्रस्ताव मान्य ः पर्यटनाला मिळणार चालना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) प्रस्तावानुसार कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या चार जिल्ह्यांतील ८ समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रकुटी (बीच शॅक्स) उभारण्याला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन किनाऱ्यांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील आरे-वारे, गुहागर, रायगडमधील दिवेआगार, वर्सेली आणि पालघर जिल्ह्यातील बोर्डी, केळवा या आठ समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रकुटी उभारण्यात येणार आहेत. कोकणच्या सौंदर्यकरणात समुद्राने मोठी भर घातली आहे. ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा कोकण किनारपट्टीला लागला आहे. देश-विदेशातील पर्यटनला कोकणची किनारपट्टी भुरळ घालत आली आहे. स्वच्छ सुंदर आणि शांततापूर्व परिसर हा येथील वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. पर्यटनाच्यादृष्टीने ही किनारपट्टी महत्त्वाची आहे. त्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे, गुहागर, रायगडमधील दिवेआगार, वर्सेली आणि पालघर जिल्ह्यातील बोर्डी, केळवा या आठ ठिकाणी ही योजना अंमलात आणली जाणार आहे.
कोकणला समृद्ध किनारपट्टी लाभली आहे. या सागर किनारपट्टीचा पर्यटनात्मक व्यावसायिक वापर करण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर पर्यटन योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी एमटीडीसीने केली होती. ही योजना राबवताना पर्यावरणाला पूरक सुविधा आणि योजनांचा वापर करण्यात यावा, असे प्रस्तावित करण्यात आले होते तसेच या सुविधांबरोबर रोजगारांच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार होती. त्यानुसार कोकणातील स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने बीस रॉक्स उभारण्यात येणार आहे. स्थानिक व्यक्तींना यात ८० टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे तीन वर्षाकरिता वाटप केले जाणार असल्याचे पर्यटन विकास मंडळाकडून सांगण्यात आले.
-------

अशी असेल रचना
किमान १५ फुटाची लांबी आणि रूंदी तसेच १२ फूट उंचीची ही कुटी असणार आहे. प्रत्येक कुटीमध्ये बसण्यासाठी १५ ते २० फूट छत टाकता येईल, अशी व्यवस्था असणार आहे. सकाळी सात वाजेपासून सायं. ७ वाजेपर्यंत या कुटी सुरू ठेवण्यास मान्यता दिली जाईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आणि पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागांवर या कुट्या उभारण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. या परवानगीसाठी लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांचा निधी ना परतावा तत्त्वावर घेण्यात येणार आहे.