रत्नागिरी ः उष्म्यामुळे 17 मेगावॅटने विजेची मागणी वाढली

रत्नागिरी ः उष्म्यामुळे 17 मेगावॅटने विजेची मागणी वाढली

उष्म्यामुळे विजेची मागणी वाढली
१ मार्चला १०५ तर १७ एप्रिलला १२२ मेगावॅट ; १७ मेगावॅटची वाढ
राजेश शेळके ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः राज्यात उष्णतेच्या लाटेचे मोठे संकट आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्म्याने नागरिक बेजार झाले आहेत. विद्युत उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात या महिन्यात विजेची मागणी १७ मेगावॅटने वाढली आहे. सुदैवाने, भारनियमन नसल्याने जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख ग्राहकांना दिलासा मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सूर्य कोपल्याप्रमाणे आग ओकत आहे. जिल्ह्याचे तापमान सुमारे ३३ ते ३४ अंशावर जात आहे. या वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात दोन दिवसांपूर्वी विजेच्या मागणीने उच्चांक गाठला. २९ हजार ११६ मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली. एकट्या मुंबईची वीजमागणी ही ३ हजार ६७८ मेगावॅटवर पोहचली आहे. महावितरणच्या ग्राहकांची आजवरची सर्वाधिक वीज मागणी ही एप्रिल २०२२ मध्ये २४ हजार ९९६ मेगावॅट नोंदवण्यात आली होती. हा आकडा आता २५ हजार १०० मेगावॅटच्या वर मागणी वाढली आहे.
जिल्ह्यात देखील विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. १ मार्चला जिल्ह्यात १०५ मेगावॅट विजेची मागणी होती. १७ एप्रिलला ती मागणी १२२ मेगावॅट एवढी वाढली आहे. म्हणजे वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्यात १७ मेगावॅट विजेची मागणी वाढली आहे. उष्म्यापासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी नागरिक एसी, कुलर, सिलिंग फॅन, टेबलफॅन आदी विद्युत उपकरणांचा वापर करत आहेत. उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे विजेची मागणी वाढू लागली आहे. उष्मा असाच वाढत राहिल्यास त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चौकट-
शितपेयांच्या विक्रीतही वाढ
जिवाची घालमेल करणाऱ्या उष्म्यापासून थोडा दिलासा मिळावा यासाठी शितपेय, ऊसाचा रस, सरबत, ताक आदिंच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. गरमीने अंगाचे पाणी पाणी होत असल्याने घसा कोरडा पडतो तसेच शरीरातील पाणीही कमी होते. त्यामुळे या शितपेये आणि सरबतांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com