चिपळूण ः | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः
चिपळूण ः

चिपळूण ः

sakal_logo
By

फोटो ओळी
-ratchl२११.jpg ः KOP२३L९७४५५ चिपळूण ः परशुराम घाटात सुरू असलेले डोंगरकटाईचे काम.
--------------

बंद कालावधीत वाहतूक चिरणी-आंबडसमार्गे
परशुराम घाटात काम सुरू ; अवजड वाहनांने अन्य मार्गाने वळविणार
चिपळूण, ता. २१ ः परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेल्या ५०० मिटर अंतरातील डोंगरकटाई व सरंक्षण भितीस भराव करण्यासाठी २५ एप्रिल ते १० मे दरम्यान घाटातील वाहतूक दुपारी १२ ते ५ सायंकाळी दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. राष्ट्रीय महामार्ग, पोलिस व परिवाहन विभागाने परशुराम घाटात वाहनांची वाहतूक सुरक्षितरित्या करण्याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस- चिपळूणमार्गे वळवण्यात येणार आहे.
परशुराम घाट बंदबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशनानुसार, परशुराम घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायं. ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील. बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी- आंबडस चिपळूणमार्गे वळवण्यात येईल. परशुराम घाटात दरड प्रवणग्रस्त भागात आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तेथे जेसीबी, क्रेन, पोकलेन, अॅम्ब्युलन्स, रस्सी, टॉर्च, अग्नीशामक वाहन इत्यादी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करावी. जबाबदार अधिकाऱ्यांसह पुरेसे मनुष्यबळ मदत व बचावकार्यासाठी उपलब्ध ठेवण्यात यावे. रस्त्याच्या बाजूस रिफ्लेक्टर लावण्यात यावे. परशुराम घाटातील वाहतूक कोणत्यावेळी वाहतुकीसाठी खुला अगर बंद राहणार आहे याबाबत घाटाच्या सुरवातीस व शेवटी तशा आशयाची वाहतुकीची चिन्हे व ठळकपणे दिसणारे फलक लावावेत. त्याबाबत स्थानिक भागात आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देण्यात यावी. परशुराम घाटातील वाहतूक कोणत्या वेळी वाहतुकीसाठी खुली अगर बंद राहणार आहे याबाबत पनवेल, सिंधुदुर्ग, गोवा व कोल्हापूर या ठिकाणी व्यापक प्रसिद्धी द्यावी. घाटातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्यादृष्टीने मुंबईवरून येणारी जास्तीत जास्त वाहने पनवेलवरून मुंबई-पुणे महामार्गावरून तसेच गोव्यावरून येणारी वाहने पाली (रत्नागिरी) येथून रत्नागिरी-कोल्हापूर-मुंबई यामार्गे वळवण्यात यावीत. या दृष्टीने कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड व रत्नागिरी यांनी संयुक्तपणे समन्वय साधून आवश्यक ती उपाययोजना करावी. या कालावधीत परशुराम घाटातील वाहनांच्या वाहतुकीबाबत सर्वतोपरी सुरक्षिततेसह सुयोग्य नियोजन करण्याची जबाबदारी उपविभागीय पोलिस अधिकारी, खेड, चिपळूण आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण-रायगड व रत्नागिरी यांची संयुक्तपणे करावयाची आहे.
परशुराम घाटातील वाहतूक थांबवल्यास तेथे थांबलेल्या वाहनधारकांकडून रोष व्यक्त होण्याची शक्यता असते. त्यासाठी घाटात सुरक्षित वाहतूक होण्याच्यादृष्टीने दोन्ही विभागांनी किमान उपअभियंता दर्जाचे जबाबदार अधिकारी यांची नेमणूक करावी. घाटात वाहतूक बंद अगर सुरू असल्याचे कालावधीत राष्ट्रीय महामार्ग विभाग व त्यांच्या ठेकेदार कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी २४ तास लक्ष ठेवणे आवश्यक राहील. घाटातील दरडप्रवण क्षेत्रामध्ये मुंबई-पुणे महामार्गावरील घाटामध्ये करण्यात आलेल्या फेन्सिंगसारखे फेन्सिंग तत्काळ करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सुमारे १५ दिवस घाटातील वाहतूक १२ ते ५ दरम्यान बंद राहणार असल्याने धोकादायक ठिकाणच्या कामास गती मिळण्यास मदत होणार आहे.