रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

संस्कृत पाठशाळेत मंगळवारी व्याख्यान
रत्नागिरी ः शहरातील झाडगाव येथील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत प्रतिवर्षी वैशाख शुद्ध पंचमीला आद्य शंकराचार्य जयंती साजरी करण्यात येते. यंदा आद्य शंकराचार्य जयंतीचे औचित्य साधून येत्या मंगळवारी (ता. २५) सायंकाळी ५ वाजता संस्कृत पाठशाळा येथे सुप्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांचे शांकरदिग्विजय या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त संस्कृतप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे आणि सचिव जयराम आठल्ये यांनी केले आहे.

भारती शिपयार्डच्या ४६० कर्मचाऱ्यांना
पीएफसह ग्रॅच्युईटीची रक्कम
दाभोळ ः दापोली तालुक्यातील उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनीमधील कर्मचाऱ्यांना युनियनचे अध्यक्ष श्याम दाभोळकर व कमिटीच्या प्रयत्नाने ४६० कर्मचाऱ्यांना पीएफ (भविष्य निर्वाह निधी) व ग्रॅच्युईटीची रक्कम मिळाली आहे. दाभोळ येथील भारतीय शिपयार्ड कपंनीची नवीन युनियन स्थापन झाल्यानंतर अध्यक्ष श्याम दाभोळकर व सर्व कमिटी सदस्यांनी चार महिन्यांतच कर्मचाऱ्यांसाठी पीएफ व ग्रॅच्युईटीची रक्कम मिळवून देण्यास मदत केली होती.


दापोली मुख्याधिकारीपदाचा
पदभार विनोद डवलेंकडे
दाभोळ ः दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार मंडणगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याकडे देण्यात आली आहे. यापूर्वी खेडच्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांच्याकडे दापोलीचा अतिरिक्त कार्यभार होता.
मुख्याधिकारी विनोद डवले मंडणगड व दापोलीचे कामकाज बघणार आहेत. दापोली नगरपंचायतीला कायम स्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे दापोलीकरांची असंख्य कामे रखडत आहेत. त्यामुळे नगरविकास विभागाने दापोली नगरपंचायतीला कायमस्वरूपी व पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी दापोलीकरांकडून करण्यात आली आहे.


कादिवलीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
दाभोळ ः दापोली तालुक्यातील कादिवली गोपाळवाडी येथे दुग्ध व्यवसाय व पशुसंगोपन मार्गदर्शन, शेतकरी मेळावा चिपळूण येथील वाशिष्ठी डेअरी दुग्ध संकलन केंद्राच्या वतीने घेण्यात आला. या वेळी कोकण कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. बी. जी. देसाई, वाशिष्ठ डेअरी संचालक प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक संचालक स्वप्ना यादव, कृषी बाजार समितीचे माजी सभापती मधुकर दळवी, प्रवीण मर्चंडे, सरपंच प्रमोद माने, उपसरपंच अनंत काते, प्रशांत पार्टे, कादीवली दुग्ध संकलन केंद्राचे भाई मर्चंडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे, कृषी सहाय्यक स्वप्नील महाडिक, पशुधन पर्यवेक्षक मंगेश कोल्हाळ यांच्यासह ४०० शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com