राजेवाडी धरण दुरुस्तीसाठी त्वरित निधी मिळावा

राजेवाडी धरण दुरुस्तीसाठी त्वरित निधी मिळावा

११ (पान ५ साठी)


-rat२१p१६.jpg ः
९७५८३
सावर्डे ः जलसंधारणाचे सचिव नंदकुमार यांची भेट घेऊन येथील राजेवाडी धरणाची वास्तव स्थिती समजावून देताना आमदार शेखर निकम.
--
राजेवाडी धरण दुरुस्तीसाठी त्वरित निधी मिळावा

आमदार शेखर निकम ; जलसंधारणाच्या सचिवांची घेतली भेट

सावर्डे, ता. २१ ः चिपळूण तालुक्यातील डेरवण-राजेवाडी धरण हे २० वर्षापूर्वी बांधले गेले असून, या धरणात गळती लागली आहे. मात्र दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध न झाल्यास तिवरे धरणाची पुनरावृत्ती होऊ शकते म्हणून राजेवाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी त्वरित निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी जलसंधारण विभागाकडे केली आहे.
आमदार निकम यांनी शासनाकडून जलसंधारणाचे सचिव नंदकुमार यांची भेट घेऊन येथील वास्तव समजावून देत धरण दुरुस्तीकरिता ९४३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक ठाणे येथील कार्यालयाकडून आपल्याकडे प्रस्तावित असून, धरणाची ३१ मीटर उंची असून लांबी ६४० आहे. या धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने येथील १० ते १२ गावाच्या नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. परिसरात गावात पाण्यासाठी वणवण करावी लागत असून येथील धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी निकम यांनी केली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com