राजापूर ः रानतळेतील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

राजापूर ः रानतळेतील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

फोटो ओळी
-rat21p19.jpg ः L97604 राजापूर ः रानतळे येथील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था.

रानतळेतील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

अ‍ॅड. जमीर खलिफे यांची तात्काळ दुरुस्तीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता.२१ ः रानतळे भागातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने रानतळे येथील शौचालयाची दुरुती करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी केली आहे. शौचालयाच्या दुरवस्थेबाबत संपर्क साधल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली गेली नसल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.
शौचालयाच्या दरवाजांची स्थिती बिकट झाली आहे. शौचालयाची तातडीने दुरुस्ती करण्यासंबंधित प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडून केवळ बघतो असे साधे उत्तर देण्यात आल्याचे सांगताना अ‍ॅड. खलिफे यांनी प्रशासनाकडून शौचालयाबाबत तक्रार करून आठवडाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना त्यांनी रानतळे येथील शौचालयाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणीही नगर पालिकेकडे केली आहे. दरम्यान, रानतळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पसरलेल्या स्थितीत आहे.
कचऱ्‍याच्या साम्राज्यामुळे या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले असून, रानतळे परिसराची तातडीने स्वच्छता करण्याचेही त्यांनी या वेळी सूचित केले आहे. रानतळे भागात गेले काही दिवस पाणीपुरवठाही विस्कळीत झालेला आहे. नगरपालिका प्रशासनाने या परिसरातील नागरिकांना चांगल्या सेवासुविधा पुरवाव्यात, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. खलिफे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com