-रत्नागिरी पालिकेच्या इमारतीसाठी पाच कोटी

-रत्नागिरी पालिकेच्या इमारतीसाठी पाच कोटी

३६ (पान ३ साठी)

रत्नागिरी पालिकेच्या इमारतीसाठी पाच कोटी

दोन टप्प्यात निधी ; वर्षभरात काम पूर्ण होणार

रत्नागिरी, ता. २१ ः येथील रत्नागिरी नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी पाच कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या कामाला वेग येणार असून पुढील वर्षभरात इमारतीचे काम पूर्ण होणार आहे.
स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालात रत्नागिरीची नगरपालिकेची जुनी इमारत नादुरुस्त असल्याचे निश्‍चित झाल्यानंतर वैशिष्ठ्यपूर्ण निधीतून नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. तत्कालीन नगराध्यक्ष राहूल पंडित आणि त्यानंतर प्रदिप उर्फ बंड्या साळवी यांच्या कालावधीत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी चौदा कोटी रुपयांचा निधी यासाठी शासनाकडून मंजूर करवून आणला होता. डिसेंबर २०२१ मध्ये इमारतीच्या कामाला वर्कऑर्डर दिली गेली. त्यानंतर कामही सुरु झाले. काही काळापूर्वी तांत्रिक अडचणी कामामध्ये आल्या होत्या. त्यामुळे कामाचा वेग मंदावला होता. मंजुर निधीपैकी पाच कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात पालिकेकडे आला होता. तळात वाहनतळ, त्यावर तळमजला आणि वरती दोन मजले अशी इमारतीची रचना करण्यात येत आहे. तिसऱ्‍या मजल्यापर्यंत काम आले आहे. दुसऱ्‍या टप्प्यातील पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे उर्वरित कामे लवकरात लवकर होणार आहे. या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. ही इमारत या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. शासनाकडून दोन टप्प्यात निधी मिळाला आहे. ही इमारत पूर्णतः वातानुकूलित उभारली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com