वाळू वाहतुक करणाऱ्या 13 डंपरवर कारवाई

वाळू वाहतुक करणाऱ्या 13 डंपरवर कारवाई

swt२११९.jpg
97637
कुडाळः येथील पोलिसांनी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाईचा बडगा उचलला. जवळपास वाळू वाहतूक करणाऱ्या १३ डंपरवर ही कारवाई करण्यात आली.

वाळू वाहतुक करणाऱ्या
१३ डंपरवर कारवाई
कुडाळात बडगाः नियमांचे पालन करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ः येथील पोलिसांनी आज दुपारी १२ च्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाईचा बडगा उचलला. जवळपास वाळू वाहतूक करणाऱ्या १३ डंपरवर ही कारवाई करण्यात आली. याबाबत येथील पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांनी आता केवळ दंडात्मक कारवाई केली असून भविष्यात नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे डंपर चालकांना समजवजा इशारा दिला. डंपरचालकांनी पुढील वाहतूक नियोजन होईपर्यंत आपली वाहने पिंगुळी मठ मार्गेच गणेश मंदिर मार्गस्थ करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.
मागील काही दिवसात कुडाळ आणि मालवण या भागात वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून यामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे अपघातांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये झाराप झिरो पॉईंट येथे झालेल्या अपघातात एका महिलेला आपला जीवही गमवावा लागला होता. मुख्य म्हणजे दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांना रोखा, असा इशारा दिला होता. त्यानंतर येथील पोलीस प्रशासनाने आज ही मोठी कारवाई केली आहे. भविष्यात नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com