आता शिक्षकांसमोर लागणार ''टिआर'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता शिक्षकांसमोर लागणार ''टिआर''
आता शिक्षकांसमोर लागणार ''टिआर''

आता शिक्षकांसमोर लागणार ''टिआर''

sakal_logo
By

swt२१२१.jpg
९७६६१
सावंतवाडीः येथे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे स्वागत करताना शिक्षक वृंद.

आता शिक्षकांसमोर लागणार ‘टिआर’
ज्ञानेश्वर म्हात्रेः अनुदानासाठी पटसंख्या अटीबाबतही निर्णय
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः डॉक्टर, वकील, इंजिनियर आदींच्या नावासमोर त्यांच्या पदव्या आहेत तशीच आता शिक्षकांच्या नावासमोर टीआर ही पदवी लावली जाणार आहे. तशी घोषणा लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज येथे दिली. वाढीव अनुदान टप्पा वाटपाबाबत पटसंख्येची अट कमी करण्यात येणार आहे. तसा निर्णयही झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
श्री. म्हात्रे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग या दोन तालुक्यात त्यांनी शिक्षकांच्या समस्या, अडचणी संदर्भात बैठका घेतल्या. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राज्याचे सहकार्यवाह रामचंद्र घावरे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्पे, सचिव गुरुदास कुसगावकर, भरत सराफदार, श्री. मोरे, रमेश जाधव, चंद्रकांत पवार, लक्ष्मण गवस, सुमेधा नाईक, श्री. म्हापसेकर, अर्चना सावंत आदींनी आपल्या समस्या, अडचणी स्पष्ट केल्या. यावेळी तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते.
श्री. म्हात्रे म्हणाले, ‘‘मी माझ्या आमदार निधीतून यापुढे प्रत्येक शाळेत ई-लर्निंग टीव्ही संच चांगल्या दर्जाचे देणार आहोत. यापुढे गावागावात इंग्रजी माध्यमांचे फॅड व शाळांकडे जाण्याची संख्या कमी व्हावी, यासाठी मराठी माध्यमांचे इंग्रजी पुस्तकात बदल केला जाणार आहे. जिल्ह्यातील शिक्षण विभागातील थकीत ४०० बिलांचे अनुदान मी पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातून उपलब्ध करून आणून दिले आहे. शिक्षकांच्या समस्या अडचणी संदर्भात स्वतः लक्ष घातले आहे. शिक्षण विभागाला टाईम बॉम्ब दिला आहे. त्या वेळातच आता शिक्षकांची कामे करण्यात येणार आहेत. शिक्षकाला आता शिक्षण विभागाच्या कार्यालय वारंवार हेलपाट्या माराव्या लागणार नाहीत. त्यांनी कोणत्याही अधिकाऱ्यांसमोर वाद घालू नये, जो वाद घालायचा असेल तो घालण्यासाठी मी आहे. तुमची अडचण, समस्या कशी सुटेल या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत.’’

चौकट
...तर त्यांना वटणीवर आणणार
शिक्षण विभागात काही एजंट बसले आहेत. ते शिक्षकांकडून विविध कामे करून घेण्यासाठी पैसे मागत आहेत. जर शिक्षकांची अशी पिळवणूक होत असेल तर त्यांना वटणीवर आणले जाईल, असेही श्री. म्हात्रे यांनी सुचित केले.