शालेय ज्यूदो स्पर्धेत अथर्व जोशीचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय ज्यूदो स्पर्धेत 
अथर्व जोशीचे यश
शालेय ज्यूदो स्पर्धेत अथर्व जोशीचे यश

शालेय ज्यूदो स्पर्धेत अथर्व जोशीचे यश

sakal_logo
By

97765
अथर्व जोशी

शालेय ज्यूदो स्पर्धेत
अथर्व जोशीचे यश
तळेरे, ता. २२ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावतीद्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डेचा विद्यार्थी अथर्व जोशी याने १४ वर्षांखालील मुलांच्या २५ किलो वजनगटात कोल्हापूर विभागातून कास्यपदकासह तिसरा क्रमांक पटकावला.
अथर्व हा कासार्डे माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या ज्यूदो कराटे क्लासचा विद्यार्थी असून आतापर्यंत त्याने विविधस्तरावर विजेतेपद पटकावले आहे. त्याला विद्यालयाचे क्रीडाशिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड, मुख्य प्रशिक्षक अभिजीत शेट्ये, प्रशिक्षक सोनू जाधव यांच्यासह पालकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्याचे कासार्डे विकास मंडळ (मुंबई), स्थानिक व्यवस्था समिती व स्कूल कमिटी सर्व पदाधिकाऱ्यांसह विद्यालयाचे प्रा. एम. डी. खाड्ये, पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून केले. या यशाबद्दल अथर्वचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.