
देवरूख नगरीत भाजपा नारीशक्तीचा मेळावा उत्साहात
२५ (पान ५ साठी)
देवरूख नगरीत भाजपा नारीशक्तीचा मेळावा
साडवली, ता. २२ ः देवरूख येथील श्री लक्ष्मीनृसिंह मंगल कार्यालयात शेकडो महिलांच्या उपस्थितीत ''नारीशक्तीचा निर्धार मेळावा'' पार पडला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा नवी मुंबईच्या माजी जिल्हाध्यक्षा तथा ''सेल्फी विथ लाभार्थी प्रकोष्ठ''च्या प्रदेश संयोजक वर्षा भोसले उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत रायगड दक्षिण जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीस तथा रत्नागिरी दक्षिण जिल्हा समन्वयक मंजुषा कुद्रीमोदी उपस्थित होत्या.
या मेळाव्याच्या निमित्ताने देवरूख शहर महिला आघाडी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. देवरूख शहराध्यक्षपदी स्नेहा फाटक यांची नियुक्ती करण्यात आली. सुप्रिया मालप व समृद्धी वेलवणकर यांची शहर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. शहर संघटन सचिव म्हणून श्रद्धा इंदुलकर यांना जबाबदारी देण्यात आली. प्रतिभा मांडवकर यांना शहर सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आले. या व्यतिरिक्त तालुका महिला मोर्चा महामंत्री म्हणून आंबेड ग्रामपंचायत सदस्या नूपुरा मुळ्ये यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रास्ताविक महिला आघाडी द. रत्नागिरी जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या जठार यांनी केले.