Wed, October 4, 2023

दाजीपूर रस्ता अवजड वाहतुकीस बंद
दाजीपूर रस्ता अवजड वाहतुकीस बंद
Published on : 23 April 2023, 9:47 am
दाजीपूर रस्ता अवजड वाहतुकीस बंद
कणकवली ः दाजीपूर ते राधानगरी रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरण सुरू असल्यामुळे फोंडाघाट मार्गे एसटीसह अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. ही वाहतूक १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान बंद राहणार आहे; मात्र, एसटी वाहतूक बंद असली तरी काही खासगी अवजड वाहनांद्वारे फोंडाघाट मार्गे वाहतूक काही दिवसांपासून सुरू झाली होती. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबात स्थानिक लोकप्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.