रत्नागिरीत संत सेना महाराजांची जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत संत सेना महाराजांची जयंती
रत्नागिरीत संत सेना महाराजांची जयंती

रत्नागिरीत संत सेना महाराजांची जयंती

sakal_logo
By

rat२३p१२.jpg
९७९६४
बांधवगढ : संत सेना महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करताना रत्नागिरी नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निशिकांत जाधव.
----------
संत सेना महाराजांची जयंती
बांधवगढ येथे उत्साहात साजरी
रत्नागिरी, ता. २३ : नाभिक समाजाचे श्रद्धास्थान संत सेना महाराज यांची ७२३ वी जयंती मध्यप्रदेश येथील उमरिया जिल्ह्यातील बांधवगढ येथे भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातून ३५० नाभिक बांधव व भगिनी या कार्यक्रमात सहभागी झाले. शिवाय राजस्थान, गुजरात उत्तरप्रदेशहून आलेले नाभिक बांधव ही उपस्थित होते.
राष्ट्रीय सैन समाज महिला अध्यक्षा सौ. चित्रा पवार यांच्यासमवेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्ताजी अनरसे, पदाधिकारी दिलीप अनर्थे, सयाजी झुंजार, विष्णू वखरे, श्री. पोफले, श्री. जगताप, माधव भाले, रत्नागिरी नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निशिकांत जाधव यांनी सेना महाराजांची पूजा केली.
४४८ चौरस किमी घनदाट अरण्यात व्याघ्र प्रकल्पात बांधवगढमध्ये सेना महाराजांची मूर्ती स्थापन केली आहे. उमरियामध्ये हजोरांच्या उपस्थितीत सेना महाराजांचा जयजयकार करत मिरवणूक काढण्यात आली. यात महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मिरवणुकीचे रुपांतर सायंकाळी सभेत झाले. यात प्रमुख पाहुण्या सौ. निशा सिंह यांनी उमरियामध्ये सेना महाराजांचे स्मारक उभारणीस तत्काळ मंजुरी व अर्थसहाय्य जाहीर केले. महाराष्ट्र नाभिक मंडळाच्या पदाधिकारी, राष्ट्रीय अध्यक्षा सौ. चित्रा पवार व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष निशिकांत जाधव यांचा उमरिया नाभिक संघटनेकडून सत्कार करण्यात आला. या अविस्मरणीय कार्यक्रमाची सर्व जबाबदारी उमरियचे दीपक सेन यांनी छानपणे पार पाडली.