किल्ले सिंधुदुर्गवर शिवरायांना गीत घोष वादन मानवंदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले सिंधुदुर्गवर शिवरायांना
गीत घोष वादन मानवंदना
किल्ले सिंधुदुर्गवर शिवरायांना गीत घोष वादन मानवंदना

किल्ले सिंधुदुर्गवर शिवरायांना गीत घोष वादन मानवंदना

sakal_logo
By

97992
मालवण ः किल्ले सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने शिवराज गीत (रचना) घोष वादन मानवंदना देण्यात आली.

किल्ले सिंधुदुर्गवर शिवरायांना
गीत घोष वादन मानवंदना
मालवण : परंपरेनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने किल्ले सिंधुदुर्ग शिवराजेश्वर मंदिर येथे शिवराज गीत (रचना) घोष वादन मानवंदना देण्यात आली.
किल्ले सिंधुदुर्ग येथे १६९५ मध्ये शिवराजेश्वर मंदिर उभारणी झाली. तेव्हापासून परंपरेनुसार द्वितीयेला किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंती सोहळा साजरा होतो. किल्ले रहिवाशी व शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी झाली. काही दिवसांपूर्वी सरसंघ चालक मोहन भागवत यांनी येथे भेट दिली होती. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवराज रचनेचा विशेष उल्लेख त्यांनी केला होता. त्यानुसार यावर्षी किल्ले सिंधुदुर्ग येथे तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने घोष वादन मानवंदना देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा संघ चालक रवी मराठे, कार्याध्यक्ष लवू म्हाडेश्वर, सहकार्यवाह पवन बांदेकर, विभाग प्रचारक विवस्वक हेबाळकर व स्वयंसेवक उपस्थित होते.
--
कोलगाववासीयांचा मुंबईत स्नेहमेळा
सावंतवाडी ः श्री सातेरी कोलगाव ग्रामस्थ मंडळ, मुंबईची २०१९ साली स्थापना झाली. कोरोना व नंतरच्या काही घडामोडींमुळे मंडळाच्या सदस्यांच्या कौटुंबिक भेटीगाठी झाल्या नाहीत. या भेटीगाठी व्हाव्यात व त्यातून नव्याने झालेल्या ओळखी अधिक वृद्धिंगत व्हाव्यात, या दृष्टीने १ मे रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत कुटुंब स्नेहमेळावा आयोजित केला आहे. विद्यार्थी व गुणीजनांचा गौरव देखील करण्यात येणार आहे. हा स्नेहमेळावा मुंबईतील काळाचौकी येथील एईएस बँक्वेट, अभ्युदय एज्युकेशन स्कूल हॉल, अभ्युदयनगर इमारत क्र. १८ च्या समोर, काळाचौकी, मुंबई येथे होणार आहे. मुंबई व कोलगावातील सर्व कोलगाववासीयांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सातेरी कोलगाव ग्रामस्थ मंडळ, मुंबईने केले आहे.