विद्यार्थ्यांच्या कलेला स्पर्धांमुळे व्यासपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांच्या कलेला स्पर्धांमुळे व्यासपीठ
विद्यार्थ्यांच्या कलेला स्पर्धांमुळे व्यासपीठ

विद्यार्थ्यांच्या कलेला स्पर्धांमुळे व्यासपीठ

sakal_logo
By

97995
मालवण ः गाबीत महोत्सव चित्रकला, निबंध स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी गंगाराम आडकर, वामन खोत आदी.


विद्यार्थ्यांच्या कलेला स्पर्धांमुळे व्यासपीठ

वामन खोत; मालवणात गाबित समाजातर्फे निबंध, चित्रकला स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : गाबीत समाजातील कार्यकर्ते आपल्या समाजासाठी चांगले कार्य करीत आहेत. समाजातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांना कलात्मक व वैचारिकदृष्ट्या व्यक्त होण्यास वाव दिला आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक वामन खोत यांनी येथे केले.
शहरातील दांडी किनाऱ्यावर होणाऱ्या गाबीत महोत्सवानिमित्त येथील भंडारी हायस्कूल येथे चित्रकला व निबंध स्पर्धा पार पडली. या दोन्ही स्पर्धांमध्ये गाबीत समाजातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे उद्‍घाटन भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत निवृत्त शिक्षक गंगाराम आडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटात झाल्या. दोन्ही स्पर्धांसाठी गाबीत समाज जीवनाशी निगडित विषय देण्यात आले होते. शिक्षक पांडुरंग कोचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही स्पर्धा झाल्या. त्यांना गाबीत समाज जिल्हा सचिव महेंद्र पराडकर, भूषण मेतर, शिक्षक नारायण पराडकर, रुपेश खोबरेकर, रुपेश प्रभू, जगन्नाथ जोशी यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी होणार असून बक्षीस वितरण गाबीत महोत्सवात करण्यात येणार आहे. यावेळी गाबीत समाजाचे बाबा मोंडकर, सेजल परब, सुरवी लोणे, माधुरी प्रभू, दिक्षा ढोके, रश्मीन रोगे, लक्ष्मीकांत खोबरेकर, गंगाराम आडकर, संमेश परब, नरेश हुले, बाबी जोगी, हेमंत मोंडकर, गणेश कुबल आदी उपस्थित होते.