आंबेगाववासीयांचे रस्त्यासाठी निवेदन

आंबेगाववासीयांचे रस्त्यासाठी निवेदन

आंबेगाववासीयांचे रस्त्यासाठी निवेदन
सावंतवाडी ः आंबेगाव सुतारवाडीत कायमस्वरूपी ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता होता. वस्तीमध्ये ज्या रस्त्याने रहदारी करत होतो, तो रस्ता त्या हद्ददाराने बंद केला आहे. त्यामुळे आमच्या वस्तीमध्ये जाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. आजारी माणसांना मुख्य रस्त्यापर्यंत उचलून आणावे लागते. घरचे सामान आणण्यासाठी मुख्य रस्त्यावरून घरापर्यंत डोक्यावरून वाहतूक करावी लागते आहे, अशी कैफियत मांडत कायमस्वरुपी रस्ता मिळवून देण्याबाबत शेकडो ग्रामस्थांनी सरपंचांना निवेदन दिले. वासुदेव गावडे, अनुसया गावडे, कृष्णा गावडे, पूनम गावडे, सुरेश परब, सुशिला परब, निखिल परब, सान्वी परब, विश्राम सावंत, सुनंदा सावंत, धोंडी सावंत, पूनम सावंत, प्रभाकर गावडे, प्रणाली गावडे, रामचंद्र परब, स्वाती परब, लक्ष्मी परब, विष्णू जाधव, लक्ष्मी जाधव, गणेश जाधव आदींच्या सहयांचे निवेदन देण्यात आले.
-----
वडाचापाटमध्ये संयुक्त जयंती
मालवण ः भारतीय बौद्ध महासभा वडाचापाट, सिद्धार्थ मंडळ वडाचापाट बौद्ध विकास मंडळ मुंबई, रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजमंदिर येथे ४ व ५ मे रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त ४ ला सकाळी नऊला निबंध स्पर्धा, सकाळी साडेअकराला वक्तृत्व स्पर्धा, दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहाला फनी गेम्स, ५ ला सकाळी नऊ ते साडेनऊ धम्मध्वजारोहण, सकाळी साडेनऊ ते साडेअकरा वंदना सूत्रपठण, दुपारी तीन ते साडेपाच धम्म ते रॅली, सायंकाळी साडेसात ते रात्री नऊला जाहीर सभा होणार आहे.
---------------
मळगावात उद्या नेत्र चिकित्सा
सावंतवाडी ः येथील नॅब नेत्र रुग्णालय आणि मळगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.२५) मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. मळगाव कुंभार्ली येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीत सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत हे शिबिर घेण्यात येणार आहे. शिबिरात नेत्र चिकित्सा मोफत केली जाणार असून औषधे तसेच नेत्र शस्त्रक्रिया माफक दरात केली जाणार आहे. नेत्र शस्त्रक्रिया कुशल डॉक्टर व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून केली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त गरजूंनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नॅब नेत्र रुग्णालय व मळगाव ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
---
दारिस्तेत नवी ओपन जीम
कणकवली ः दारिस्ते गावातील तरुणांचे आरोग्य निरोगी राहावे, या उद्देशाने बौद्धवाडी येथील समाज मंदिरच्या असलेल्या मोकळ्या परिसरात ओपन जीम तयार करण्यात आली आहे. दारिस्ते ग्रामपंचायतीमार्फत ओपन जीम होण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केला होता. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांनी जीम मंजूर होण्यासाठी विशेष प्रयत्न केले, अशी माहिती दारिस्ते सरपंच सानिका गावकर व उपसरपंच संजय सावंत यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com