
रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा
पान ५ साठी, संक्षिप्त
रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे प्रदर्शन
रत्नागिरी : गेली सतरा वर्षे महिला बचत गट व उद्योगिनींना प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे यांनी रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे ३० एप्रिलपासून मान्सूनपूर्व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये मसाले, पीठे, बेगमीचे पदार्थ आणि आंबेसुद्धा मिळणार आहेत. जे. के. फाईल्स येथील साई मंगल कार्यालयात हे प्रदर्शन ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत होणार आहे. गेली अनेक वर्षे महिला दिन, खास दिवाळी खरेदीसाठी प्रदर्शने भरवणाऱ्या ग्राहक पेठेने लोकाग्रहास्तव मान्सूनपूर्व प्रदर्शन आयोजित केले आहे. गेली अनेक वर्षे महिला बचत गटांचे संघटन, एकत्रिकरण आणि महिला उद्योगिनींना सर्वतोपरी मदत करणाऱ्या प्राचीताई शिंदे यांनी प्रदर्शन व विक्रीकरिता स्टॉल्सचे नियोजन केले आहे. या प्रदर्शनात महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये वेशभूषा स्पर्धा, सांस्कृतिक, मार्गदर्शन, प्रशिक्षण, फनिगेम आदीसुद्धा रंगणार आहेत.
स्पंदन कार्यक्रमात साक्षी जाधव द्वितीय
पावस : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक) दरवर्षी स्पंदन या कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांना यात भाग घेण्यासाठी प्रेरित करते. यावर्षीच्या स्पंदन कार्यक्रमात ललित कला या विभागात लोटे येथील एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. नर्सिंग महाविद्यालयातील एकूण तीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यामध्ये साक्षी जाधव या विद्यार्थिनीला ऑन दी स्पॉट पेंटिंगमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पक्षी आणि पर्यावरण या विषयावर तिने पेंटिंग केले होते. त्याचप्रमाणे सुजल जोशी या विद्यार्थ्याला स्पॉट पोस्टर मेकिंगमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. मानव आणि पर्यावरण या विषयावर त्याने पोस्टर बनवले होते. विद्यापीठाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात दोघांचा सत्कार करण्यात आला. एमईएसआयएचएसचे डायरेक्टर डॉ. श्याम भाकरे, प्राचार्य मिलिंद काळे व सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.
संगमेश्वर पदवीधर शिक्षक संघटनेच्या
अध्यक्षपदी सुनील करंबेळे
पावस ः महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ व पदवीधर, प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सर्वसाधारण सभेत हातीवचे शिक्षक सुनील करंबेळे यांची पदवीधर शिक्षक संघटना तालुका अध्यक्षपदी. तर लक्ष्मण काळे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापूर्वी संघटनेच्या विविध पदावर करंबेळे यांनी संघटक म्हणून उत्तम प्रकारे काम पाहिले आहे. त्यामुळे त्याचा उपयोग होईल असे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर यांनी सांगितले. सरचिटणीस दीपक माळी, जिल्हा नेते उदय शिंदे, शिक्षक पतपेढी उपाध्यक्ष संजय डोगे, माजी कार्याध्यक्ष अशोक भालेकर रत्नागिरी शाखेचे केशव सावंत आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
भारतीय स्त्री शक्तीतर्फे दत्तक विद्यार्थिनींना मार्गदर्शन
पावस : चिपळूण येथील भारतीय स्त्री शक्ती शाखेतर्फे सुकन्या विद्या निधी प्रकल्पांतर्गत दत्तक घेतलेल्या विद्यार्थिनींना दहावीनंतर काय? यासाठी व्यवसाय मार्गदर्शन घेण्यात आले. हा कार्यक्रम शहरातील गांधारेश्वर मंदिराच्या आवारात झाला. यामध्ये आयटीआय कोर्सेसची माहिती देण्यासाठी निवृत्त प्रा. मुसळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मुलींना आयटीआयच्या विविध कोर्सेसची, प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले.
९८०६७
मावळंगे-गझनेवाडी रस्ता कामाजे भूमिपूजन
पावस : रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील गझनेवाडी–बहुतुलेवाडी रस्ता कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश म्हाप, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, जिल्हा कार्यालय प्रमुख प्रशांत सुर्वे, उपतालुकाप्रमुख सुनील नावले आदी उपस्थित होते.