वेत्ये अपघातप्रकरणी बस चालकावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेत्ये अपघातप्रकरणी
बस चालकावर गुन्हा
वेत्ये अपघातप्रकरणी बस चालकावर गुन्हा

वेत्ये अपघातप्रकरणी बस चालकावर गुन्हा

sakal_logo
By

वेत्ये अपघात प्रकरणी
बसचालकावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ : वेत्ये येथे बस घळणीत घसरल्याने शुक्रवारी (ता. २१) झालेल्या अपघात प्रकरणी क्लीनरच्या तक्रारीवरून चालक सतीश पंढरी भोसले (रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अपघात मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री घडला होता. यात क्लीनर तालीब अकबर अली खान (वय २९, रा. बोरिवली-मुंबई) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारांसाठी प्रथम सावंतवाडी व नंतर गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. खान याने दिलेल्या तक्रारीनुसार बसचालक भोसले याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई ते गोवा असा प्रवास करताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला होता.