
यशश्री ताम्हणकरला सुवर्णपदक
यशश्री ताम्हणकरला सुवर्णपदक
मालवण ः मसुरे केंद्रशाळेची विद्यार्थिनी यशश्री ताम्हणकर हिने मुंबई चर्चगेट येथे झालेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत कोल्हापूर विभागातून सुवर्णपदक पटकावले. डॉ. यदुनाथ थत्ते (वैज्ञानिक), डॉ. नंदिनी देशमुख (लेखिका) यांच्या हस्ते सुवर्णपदक, गौरवपत्र आणि तीन हजार रुपये बक्षीस देऊन यशश्रीला एसएनडीटी कॉलेज, चर्चगेट-मुंबई येथे गौरविण्यात आले. संजय सावंत (विलेपार्ले) यांनीही पाचशे रुपये देऊन तिला सन्मानित केले. तिचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसूरकर, उपाध्यक्ष शीतल मसूरकर, लक्ष्मी पेडणेकर, मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, गुरुनाथ ताम्हणकर, विनोद सातार्डेकर, गोपाळ गावडे, रामेश्वरी मगर आदींनी कौतुक केले.
-----------------
तन्मयी भगतचे स्क्वॅश स्पर्धेत यश
कुडाळ ः कसाल-कुंभारवाडी येथील रहिवासी न्यू इंग्लिश स्कूल शाळेची विद्यार्थिनी तन्मयी भगत हिने अमरावती येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला. तिची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल संस्थेचे अध्यक्ष, शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांकडून तिचे कौतुक केले जात आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियम अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत तन्मयी हिने पाचवा क्रमांक पटकावत चांगली कामगिरी केली. अतिशय कमी कालावधी व प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ कमी मिळूनसुद्धा तिने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले. त्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.
--
सनातन संस्थेतर्फे आंदुर्लेत स्वच्छता
कुडाळ ः सनातन संस्था चेन्नई न्यासच्यावतीने आंदुर्ले येथील श्री देवी आंदुर्लाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. श्री देवी आंदुर्लाई मंदिरात साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडुलकर, न्यासचे कार्यकर्ते वसंत कोनकर, हनुमंत पाटील, बाळ पेडणेकर, पंढरीनाथ भाईप, मयूर तवटे, प्रणिता तवटे, सदाशिव पाटील सहभागी झाले. हा उपक्रम राबविल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. समाजात न्यासातर्फे असे शैक्षणिक, आरोग्य तपासणी, सामाजिक, दारिद्र्य निर्मूलन असे विविध उपक्रम घेण्यात येतात, असे सरपंच तेंडुलकर यांनी सांगितले.