डेगवेवासीयांना ‘आनंदाचा शिधा’

डेगवेवासीयांना ‘आनंदाचा शिधा’

98217
डेगवे ः येथे आनंदाचा शिधा वाटप करताना मान्यवर.

डेगवेवासीयांना ‘आनंदाचा शिधा’
बांदा ः डेगवे येथील शासनमान्य रास्त धान्य दुकानात शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करण्यात आले. यावेळी डेगवे सोसायटीचे चेअरमन प्रवीण देसाई, सरपंच राजन देसाई, भाजपाचे सरचिटणीस मधुकर देसाई, माजी सभापती भगवान देसाई, आबाजी सावंत, ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई, सूर्याजी देसाई, जयवंत देसाई आदी उपस्थित होते.
--
सावंत, लिंगवत यांची निवड
ओटवणे ः महाबळेश्वर पाचगणी येथे झालेल्या दहा दिवसीय आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिरात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या ओवळीये गावचा सुपुत्र ऋतिक सावंत आणि वेर्लेचा सुपुत्र श्रीकृष्ण लिंगवत यांची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशनने आयोजित केलेल्या या दहा दिवसीय आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोच उपस्थित होते. या शिबिरात ऋतिक आणि श्रीकृष्ण या दोघांनी चांगली कामगिरी बजावली. त्यामुळे ऋतिक याची ५८ किलो वजन गटातून, तर श्रीकृष्ण याची ५५ किलो वजन गटातून राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. येत्या जुलैमध्ये पंजाब येथे राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com