कुडाळ येथे उद्यापासून
‘आयुष्यमान कार्ड’ शिबिर

कुडाळ येथे उद्यापासून ‘आयुष्यमान कार्ड’ शिबिर

कुडाळ येथे उद्यापासून
‘आयुष्यमान कार्ड’ शिबिर

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ ः आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना असून ती विमा आणि हमी तत्वावर राबविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड (ई-कार्ड) असणे आवश्यक आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये २.५३ कोटी लाभार्थ्यांपैकी ७७.८३ लाळ लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आले आहे.
आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थ्यांना १०० टक्के आयुष्यमान कार्ड वितरित करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची यादी नगरपंचायत कार्यालय येथे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली असून, नगरपंचायत हद्दीतील ज्या लाभार्थ्यांनी यादीमध्ये नाव असूनही ‘केवायसी’ केलेले नाही तसेच अद्यापपर्यंत आयुष्यमान कार्ड काढलेले नाही, त्या लाभार्थ्यांचे ‘केवायसी’ करण्यासाठी आणि आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी येथील नगरपंचायतीने २६ ते २८ एप्रिल दरम्यान शिबिर आयोजित केले आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी करिश्मा नायर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com