आजगाव येथे रविवारी शास्त्रीय गायन स्पर्धा

आजगाव येथे रविवारी शास्त्रीय गायन स्पर्धा

98216
मंजिरी आलेगावकर

आजगाव येथे रविवारी
शास्त्रीय गायन स्पर्धा
सावंतवाडी, ता. २४ ः श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग आणि स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राधाकृष्ण चषक २०२३’, या संगीत उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा मर्यादित शास्त्रीय गायन (हिंदुस्तानी ख्याल) स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा रविवारी (ता. ३०) दुपारी तीनला श्री देव वेतोबा मंदिर सभागृह, आजगाव (ता. सावंतवाडी) येथे होणार आहे. स्पर्धेचे परीक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या विख्यात शास्त्रीय गायिका विदुषी मंजिरी आलेगावकर करणार असून शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करणार आहेत.
आलेगावकर यांचे वडील पं. मोहन कर्वे हे गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे यांचे शिष्य आणि उत्तम गायक कलाकार होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर गायकीचे, शास्त्रीय संगीताचे संस्कार झाले. सुप्रसिद्ध गायक आणि संगीत समीक्षक (कै.) पं. वामनराव देशपांडे यांची खास जयपूर घराण्याची तालीम त्यांनी अनेक वर्षे घेतली. (कै.) अप्पा कानिटकर, पं. हळदणकर यांचेही मार्गदर्शन त्यांना मिळाले. संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेरही अनेक ठिकाणी महत्त्वाच्या व्यासपीठांवर त्यांनी मैफली गाजविल्या आहेत. त्यांना भारतरत्न पं. भीमसेन जोशींच्या हस्ते ‘कुमार गंधर्व’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. अशा या विख्यात कलाकार स्पर्धेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग येथे येत असल्याने शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक पर्वणी आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या संस्थापिका वीणा दळवी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com