रत्नागिरी-कुणबी सेनेकडून बळीराज सेना पक्षाची स्थापना

रत्नागिरी-कुणबी सेनेकडून बळीराज सेना पक्षाची स्थापना

कुणबी समाजाकडून बळीराज सेना पक्षाची स्थापना
मोठा राजकीय निर्णय ; ३० वर्षानंतर स्वपक्ष
रत्नागिरी, ता. २४ : गेली ३० वर्षे सत्ताकारणापासून दूर राहिलेल्या कुणबी समाजाने मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणबी समाजाने नवीन पक्षाची स्थापना केली आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे शनिवारी (ता. २२) अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बळीराज सेना पक्ष स्थापन करण्यात आला आहे. या पक्षाच्या अध्यक्षपदी रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.
राज्यातील राजकारणात वेगाने घडामोडी घडत असतानाच बळीराज सेना पक्षाच्या माध्यमातून राज्यात नवीन पक्षाचा उदय झाला आहे. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संचालित कुणबी राजकीय संघटन समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी आमदार दिगंबर विसे, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, सरचिटणीस अरविंद डाफळे, उपाध्यक्ष सदानंद काष्टे, हरिश्चंद्र म्हातले, सहसचिव अशोक करंजे, भास्कर चव्हाण, हरिश्चंद्र पाटील, अशोक वालम, नंदकुमार मोहिते, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, संजय हंडोरे, सुवर्णा पाटील, सुरेखा लोखंडे, मनोहर जोशी, प्रकाश बांगरस, गिरीश मोंडे उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिगंबर विसे म्हणाले, हा पक्ष कोकणापुरता मर्यादित असता कामा नये. देशातील नामांकित पक्ष असला पाहिजे. आज आपण दिवा लावला आहे तो अखंड तेवत ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी उचलायची असेल तर सणासारखे वागून चालणार नाही.
--------------
चौकट
कोकणाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही ः वालम
कोणतीही संघटना, पक्ष पुढे न्यायचा असेल तर महिलांचा वाटा मोठा पाहिजे. त्यांना संधी दिली पाहिजे. ती संधी या पक्षाच्या माध्यमातून मिळेल. अक्षय म्हणजे कधीही न तुटणारा म्हणून आजच्या दिवशी पक्षाची स्थापना करण्यात आली. कोकणातील राज्यकर्त्यांनी स्वार्थापलीकडे काही पाहिले नाही. स्वार्थी नसते तर कोकण उद्ध्वस्त करणारेच प्रकल्प का आणता? विकासाच्या नावावर विनाश करत आहेत. यापुढे बळी राज सेना कोकणाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे स्पष्ट मत पक्षाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com