
साडवली-कसब्यातील सोमेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता
कसब्यातील सोमेश्वर मंदिर
परिसराची स्वच्छता
साडवली, ता. २४ : दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने कसबा येथील सोमेश्वर मंदिर परिसर स्वच्छता व श्रमदान मोहीम राबविण्यात आली. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून दुर्गवीर सोमेश्वर मंदिराकडे रवाना झाले. तेथे झाडाझुडपांनी विळखा घातलेली प्राचीन मंदिरे मोकळी करण्यात आली. पालापाचोळा साफ करण्यात आला. काशी विश्वेश्वर मंदिराच्या बाजूचा परिसर साफ करण्यात आला. रस्त्यालगतची झुडपे तोडण्यात आली. त्यामुळे सर्व मंदिर मोकळा श्वास घेत आहेत.
काशी विश्वेश्वर मंदिरासमोर विहिरीला पावसाळी पाण्यासोबत पालापाचोळा, माती आतमध्ये जाऊ नये यासाठी दगडाचा एका बाजूने कठडा तयार करण्यात आला. तेथील रहिवासी भैरीभवानी मंदिराचे पुजारी सतीश लिंगायत यांनी सहकार्य केले. ही मोहीम अजित राणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या मोहिमेमध्ये दुर्गवीर प्रतिष्ठानचे निशांत जाखी, योगेश सावंत, शिवम सावंत, संकेत सावंत, मंगेश शिवगण, दीप्ती साळवी, विराज नटे, स्वरूप नलावडे, उत्कर्ष माने, प्रणव राक्षे, वेदांत तेंडुलकर, सार्थक डोलारे या सदस्यांनी सहभाग घेतला होता.