दोन एकर काजू बाग 
तळवडेत जळून खाक

दोन एकर काजू बाग तळवडेत जळून खाक

९८२४३

दोन एकर काजू बाग
तळवडेत जळून खाक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः तळवडे-परबवाडी (ता.सावंतवाडी) येथे दोन एकर क्षेत्रातील काजू बागेस आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. संबंधित काजू बागेचा प्रशासनाने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.
तळवडेत आग लागून झालेल्या या नुकसानीत अनिल परब, सुनील परब, मकरंद परब या शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकले नाही. आगीत काजू कलमे खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्‍यांचे मोठे नुकसान झाले. दुपारच्या वेळी आग लागल्याने ती आटोक्यात आणणे कठीण झाले; परंतु परब कुटुंबीयांनी तातडीने धाव घेत अथक परिश्रमांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे आजूबाजूच्या काजू तसेच आंबा कलमांचे नुकसान टळले. आग अटोक्यात आणण्यासाठी मुन्ना परब, ओंकार परब, सर्वेश परब, बंटी परब, रवी परब, अनिल परब, अक्षय परब, अथर्व परब, अमित परब, प्रथा परब यांनी प्रयत्न केले. आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी परब कुटुंबीयांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com