खेड-आंबयेत गोठ्याला आग, 3 जनावरे होरपळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-आंबयेत गोठ्याला आग, 3 जनावरे होरपळली
खेड-आंबयेत गोठ्याला आग, 3 जनावरे होरपळली

खेड-आंबयेत गोठ्याला आग, 3 जनावरे होरपळली

sakal_logo
By

आंबयेत गोठ्याला आग,
तीन जनावरे होरपळली
खेड, ता. २४ : तालुक्यातील आंबये येथे गोठ्याला लागलेल्या आगीत 3 जनावरे मृत्यूमुखी पडली. येथील पालिकेच्या अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तब्बल ४ तासानंतर आग आटोक्यात आणली. आंबये येथील बाळाराम रामचंद्र सकपाळ यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली. गोठ्याला आग लागल्याचे कळताच नजीकचे ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. आगीने रौद्ररूप धारण
केले होते. याबाबत पालिकेच्या अग्निशमन केंद्रास कळवल्यानंतर फायरमन दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, नितेश भालेकर, वाहनचालक गजानन जाधव, मदतनीस सुदेश शिगवण आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र या भीषण आगीत बाळाराम सकपाळ यांच्या गोठ्यातील एक गाय, बैल व वासरू मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेत त्यांचे मोठे नुकसान झाले.