‘सकाळ’ सावंतवाडी विभागीय
कार्यालयाचा आज वर्धापन दिन

‘सकाळ’ सावंतवाडी विभागीय कार्यालयाचा आज वर्धापन दिन

‘सकाळ’ सावंतवाडी विभागीय
कार्यालयाचा आज वर्धापन दिन

‘स्वरसंध्या’चे आयोजन; ‘ग्रामगाथा’ पुस्तिकेचेही प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः येथील ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन उद्या (ता. २५) साजरा होत आहे. यानिमित्त श्री सद्‌गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडी प्रस्तुत ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त ‘ग्रामगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे, तरी वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, विक्रेत्यांसह जिल्हावासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे केले आहे.
‘सकाळ’च्या सावंतवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘ग्रामगाथा’ ही पुस्तिका प्रसिद्ध करणार आहोत. यात सिंधुदुर्गातील ग्रामविकासाचा प्रवास मांडणारे मान्यवरांचे लेख आहेत. याचे प्रकाशन सकाळच्या सत्रात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते सावंतवाडीचे तहसीलदार अरुण उंडे आणि सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यानिमित्त सायंकाळी सहाला श्री सद्‌गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडी प्रस्तुत ‘स्वरसंध्या’ हा हिंदी, मराठी गीतांचा सदाबहार नजराणा असलेला कार्यक्रम येथील केशवसुत कट्टा, मोती तलाव येथे होणार आहे. ‘सकाळ’च्या वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, वृत्तपत्र विक्रेते यांच्यासह जिल्हावासीयांनी यावेळी उपस्थित राहावे आणि ‘सकाळ’शी असलेले नाते अधिक वृद्धिंगत करावे, असेही आवाहन ‘सकाळ’ माध्यम समूहाने केले आहे.
‘सकाळ’ने पत्रकारितेच्या माध्यमातून सिंधुदुर्गाशी वेगळे नाते निर्माण केले आहे. येथील सर्वसामान्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याबरोबरच सिंधुदुर्गचा विकास कसा असायला हवा, याला दिशा देण्याचे कामही ‘सकाळ’ने अनेक वर्षे केले. जिल्ह्यातील पर्यटनाची दिशा, आरोग्यविषयी प्रश्‍न, पर्यावरण याबरोबरच जिल्ह्याच्या विकासाचे धोरण कसे असायला हवे, याविषयी ‘सकाळ’ने नेहमीच आग्रही भूमिका घेतली. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अशा अनेक विषयांवर प्रकाशझोत टाकला. वाचक, हितचिंतकांच्या पाठबळावर जिल्ह्यात ‘सकाळ’ भक्कम पाय रोवून उभा आहे. वर्धापन दिन हे ‘सकाळ’ आणि सिंधुदुर्ग यांच्या नात्याला आणखी भक्कम करणारे एक निमित्त आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी यात सहभागी व्हावे, असे आग्रहाचे आवाहन ‘सकाळ’ परिवाराने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com