गुजरात पोलिस आरोपीच्या शोधात रत्नागिरीत

गुजरात पोलिस आरोपीच्या शोधात रत्नागिरीत

पान १ साठी

संशयिताच्या ताब्यासाठी
गुजरात पोलिस रत्नागिरीत
अमली पदार्थ पुरवठा साखळीतील एकाचा घेणार ताबा
रत्नागिरी, ता. २४ : एका महिलेच्या माध्यमातून रत्नागिरीतून अहमदाबादला ड्रग्जचा सप्लाय (पुरवठा) झाल्याने गुजरात पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधात रत्नागिरीत दाखल झाली आहे, मात्र रत्नागिरी शहर पोलिसांनी तत्परता दाखवत १८ फेब्रुवारीला त्यातील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे तो संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील नवरंगपुरा पोलिसांनी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई केली होती. याप्रकरणी जयजायलो हेमंतकुमार देसाई (रा. अंबाडी, जिल्हा सुरेंद्रनगर) याला २० फेब्रुवारीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हस्तगत केले होते. त्याला ड्रग्जचा पुरवठा कोणाकडून झाला याबाबत गुजरात पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्याने राजश्री प्रवीणचंद्रा देसाई हिच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली होती. राजश्रीने हे ड्रग्ज अब्दुल मार्टीन ऊर्फ हसनमियाँ डोंगरकर (रा. कर्ला, रत्नागिरी) यांच्याकडून आणल्याचे गुजरात पोलिसांना सांगितले होते. या माहितीच्या आधारे गुजरात पोलिसांचे पथक डोंगरकर याच्या शोधात आज रत्नागिरीत दाखल झाली.
शहर पोलिस ठाण्यात त्यांनी पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांची भेट घेतली. त्यांना गुन्ह्याबाबत माहिती दिली. या आरोपीला अटक करण्यासाठी गुजरात पोलिसांनी शहर पोलिसांची मदत मागितली. ज्यावेळी आरोपीचे नाव गुजरात पोलिसांनी सांगितले, त्यावेळी गुजरात पोलिसांना हवा असलेल्या आरोपीला शहर पोलिसांनी १७ फेब्रुवारीलाचा अटक केल्याचे सांगितले. हा संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती गुजरात पोलिसांना दिली. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा ताबा मिळावा यासाठी गुजरात पोलिस रत्नागिरी न्यायालयात अर्ज करणार असून, न्यायालयाच्या आदेशानंतर या आरोपीचा ताबा गुजरात पोलिसांना मिळणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com