
सोनवडेपार-वराड पुलाची राऊत, नाईकांकडून पाहणी
98367
सोनवडेपार वराड ः पुलाच्या कामाची आज खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली.
सोनवडेपार-वराड पुलाची
राऊत, नाईकांकडून पाहणी
मालवण : सोनवडेपार-वराड पुलाच्या कामाची खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी आज पाहणी केली. यावेळी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिल्या. खासदार राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा करून सरंबळ सोनवडेपार वराड रस्त्यावर वराड येथे मोठे पूल मंजूर करून घेतले आहे; मात्र सीआरझेडच्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रेंगाळले होते. त्यासाठीही खासदार राऊत, आमदार नाईक यांनी पाठपुरावा करून काम सुरू करून घेतले. आज या पुलाच्या कामाची पाहणी अधिकाऱ्यांसोबत केली. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना ठेकेदार व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. रस्त्याच्या कामामुळे माडांचे नुकसान होणार आहे. त्यासंदर्भातील नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे सहाय्यक अभियंता माळगावकर, किशोर भगत, आपा आळवे, हरिश्चंद्र पवार, अनिल परब, सोमा परब, वराड सरपंच शलाका रावले, किशोरी भगत, शिवाजी चव्हाण, गोपाळ परब, राजू घाडी, आपा परुळेकर, अशोक परब, अमित आंबेकर, बाळा गावडे, कमलाकर परब, विनोद आळवे, बाबू टेंबुलकर आदी उपस्थित होते.
..............
98368
मालवण ः निबंध स्पर्धेत प्रथम आलेल्या तन्मय परबचे मुख्याध्यापक वामन खोत यांनी अभिनंदन केले.
निबंध स्पर्धेत तन्मय परबचे यश
मालवण : छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सारथी, पुणे यांच्यावतीने प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरावर घेतलेल्या निंबध स्पर्धेत प्राथमिक गटात मालवण येथील भंडारी हायस्कूलचा पाचवीचा विद्यार्थी तन्मय परब याने प्रथम क्रमांक पटकावला. सारथी पुणे यांच्यावतीने छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात तालुकास्तरीय निबंध स्पर्धेच्या प्राथमिक गटात येथील भंडारी हायस्कूलमधील तन्मय परब याने प्रथम क्रमांक पटकावला. तन्मय याच्या या यशाबद्दल भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक वामन खोत, संस्थाध्यक्ष विजय पाटकर आदींनी अभिनंदन केले.