व्हॉलीबॉल प्रशिक्षणाचे देवगडमध्ये उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हॉलीबॉल प्रशिक्षणाचे देवगडमध्ये उद्‍घाटन
व्हॉलीबॉल प्रशिक्षणाचे देवगडमध्ये उद्‍घाटन

व्हॉलीबॉल प्रशिक्षणाचे देवगडमध्ये उद्‍घाटन

sakal_logo
By

98378
देवगड ः येथे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिराचे उद्‍घाटन चंद्रकांत शिंगाडे यांच्या हस्ते झाले.

व्हॉलीबॉल प्रशिक्षणाचे देवगडमध्ये उद्‍घाटन
देवगड, ता. २४ ः येथील शेठ म. म. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन शाळेच्या स्थानिय समितीचे सदस्य तथा माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मुख्याध्यापक संजीव राऊत, पर्यवेक्षक सुनील घस्ती, मार्गदर्शक सुरेंद्र वारंग (मालवण) तसेच क्रीडा विषय शिक्षक आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी श्री. शिंगाडे यांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्यासाठी खेळाचे महत्त्व जाणून जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळावेत, असे आवाहन केले. शिबिरात मार्गदर्शक श्री. वारंग यांनी विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉल खेळातील कौशल्य प्रात्यक्षिकासह दोन दिवस मार्गदर्शन केले. या शिबिराचा शाळेतील ३५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शिबिराचे आयोजन शाळेतील क्रीडा विषय शिक्षक समितीमार्फत करण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन ज्ञानेश्वर कुंभरे यांनी केले. प्रास्ताविक करून आभार मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी मानले. भविष्यात देखील विविध खेळांची शिबिरे घेण्याचे ठरविण्यात आले.