‘सकाळ’मुळेच विकासाला दिशा

‘सकाळ’मुळेच विकासाला दिशा

98443
सावंतवाडी ः ‘सकाळ’च्या वर्धापन पुस्तिकेचे प्रकाशन करताना जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी. शेजारी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, ‘सकाळ’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक शिवप्रसाद देसाई, हेमंत खानोलकर, गुरुनाथ कदम, रुपेश हिराप आदी.


‘सकाळ’मुळेच विकासाला दिशा

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी; सावंतवाडीत ‘ग्रामगाथा’ पुस्तिकेचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः राज्याच्या जडणघडणीत ‘सकाळ’चा महत्त्वाचा वाटा आहे. राज्याप्रमाणेच जिल्ह्यात आजपर्यंत विविध उपक्रम राबवित ‘सकाळ’ने विकासाला योग्य दिशा देण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता इथल्या तरुणांना व शेतकरी, महिलांना योग्य दिशा देण्याचे काम होऊ शकले नाही. त्यामुळे सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या ‘सकाळ’ने यात पुढाकार घ्यावा. ‘सकाळ’च हे काम प्रभावीपणे करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी ‘सकाळ’ कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘ग्रामगाथा’ पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, ‘सकाळ’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक शिवप्रसाद देसाई, जाहिरात विभाग प्रमुख हेमंत खानोलकर, वितरण विभाग प्रमुख गुरुनाथ कदम, बातमीदार रुपेश हिराप, निखिल माळकर, ‘सकाळ’चे विक्रेते अरुण वझे यांच्यासह गौतम बुद्धघोष, संतोष ठाकूर, सुभाष तोरसकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ‘सकाळ’चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
श्री. दळवी म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून काम करत असताना आमची नाळ ग्रामीण भागातील जनतेशी जोडलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी, सक्षमीकरणासाठी ‘सकाळ’ने ‘ग्रामगाथा’ हा विषय घेऊन प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन माझ्या हस्ते होणे, हे खरोखर माझ्यासाठी भाग्य आहे. महिला, युवक, रोजगार, अर्थशास्त्र अशा विविध विषयांना हात घालत ‘सकाळ’ने समाजाचा सर्वांगीण विचार करत दर्जेदार काम केले. गेले वर्षभर जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे. या वर्षभराच्या वाटचालीत बँकेच्या विविध उपक्रमांना बळ देण्याचे काम ‘सकाळ’ने केले. जिल्ह्यातील दूध उत्पादकांसाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये महत्त्वाची बाजू ‘सकाळ’ने उचलली.
समाजात घडणाऱ्या दैनंदिन बातम्या वृत्तपत्रात येणे क्रमप्राप्त आहे; मात्र त्या पलीकडे जाऊन समाजाला दिशा देणारे वृत्तांकन ‘सकाळ’ करत आहे. ‘सकाळ’मुळे माझ्यासारख्या एका पदाधिकाऱ्याला काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते. योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही गोष्टींचा विचार ‘सकाळ’ने नेहमीच केला. महाराष्ट्राचा विचार करता समाजाभिमुख विविध उपक्रम ‘सकाळ’ राबवितो. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी विविध उपक्रम ‘सकाळ’ने हाती घेतले आहेत. याच धर्तीवर जिल्ह्याच्या विकासासाठीही आगामी काळात असेच उपक्रम हाती घ्यावेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या भवितव्यासाठी सर्वसमावेशक, शाश्वत विकासाचे उद्दिष्ट ठेवून वाटचाल सुरू आहे. टप्प्याटप्प्याने येथील शेतकरी, महिला, युवकांसाठी काम केले जाणार आहे. केवळ बँक म्हणून आम्हाला काम करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सोबत घेऊन आमची वाटचाल राहील.’’
श्री. जावडेकर म्हणाले, ‘‘आजच्या स्पर्धेच्या युगात वृत्तपत्रांमध्ये सवंग, उथळ आणि भडकाऊ बातम्या पाहायला मिळतात; मात्र ‘सकाळ’ने नेहमीच सामाजिक भान जपले. समाजात प्रक्षोभक वातावरण निर्माण करणारे एकही वृत्त ‘सकाळ’मध्ये वाचायला मिळत नाही. समाज प्रबोधनाचे खऱ्या अर्थाने काम ‘सकाळ’कडून घडत आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणाऱ्यांपैकी ‘सकाळ’ आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात आज हे वृत्तपत्र पोहोचले आहे.’’ वरिष्ठ उपसंपादक श्री. देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जाहिरात विभागाचे प्रमुख श्री. खानोलकर यांनी आभार मानले.
................
चौकट
सुजाण नागरिक घडवण्यात ‘सकाळ’चा मोठा वाटा
यावेळी मुख्याधिकारी जावडेकर ‘सकाळ’च्या उपक्रमांविषयी बोलताना म्हणाले, ‘‘माझ्या जीवनातील यशात ‘सकाळ’चा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मी ‘सकाळ’चा नियमित वाचक आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना ‘सकाळ’ आवर्जून वाचत होतो. ‘सकाळ’मध्ये येणारे संपादकीय लेख आजही कात्रण स्वरुपात माझ्याकडे आहेत. सुजाण नागरिक घडविण्याचे काम अविरतपणे ‘सकाळ’कडून घडत राहो.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com