६४ लाखांच्या खर्चानंतरही १६ वर्षे नाट्यगृह बंदच

६४ लाखांच्या खर्चानंतरही १६ वर्षे नाट्यगृह बंदच

ग्राऊंड रिपोर्ट---लोगो

rat२५p२२.jpg :
98491
स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाची इमारत.
rat२५p२३.jpg
98492
ठाकरे नाट्यगृहाच्या आवारात खासगी गाड्यांची पार्किंग व्यवस्था केली आहे.
rat२५p२४.jpg
98493
नाट्यगृहाच्या दरवाजाची अशी पडझड झाली आहे.
rat२५p२५.jpg
98494
नाट्यगृहाच्या लाईट मिटर रूमची अशी व्यवस्था झाली आहे.
rat२५p२६.jpg
98528
नाट्यगृहाच्या रंगमंचाची झालेली अवस्था.
rat२५p२७.jpg
98496
नाट्यगृहाच्या खुर्च्यांची झालेली अवस्था. (सिद्धेश परशेट्ये ः सकाळ छायाचित्रसेवा)
------
६४ लाखांच्या खर्चानंतरही १६ वर्षे नाट्यगृह बंदच
स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाची रखडकथा ; घोषणांचा पाऊस, निधीचा चुराडा
सिद्धेश परशेट्येः सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ः खेड येथील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचा विषय अनेक वर्षापासून खितपत पडलेला आहे. या नाट्यगृहासाठी वर्षानुवर्षे केवळ घोषणांचा पाऊस पाडत केवळ दुरुस्तीच्या नावाखाली लाखोंची उधळपट्टी नगरपालिकेकडून करण्यात आली. एकीकडे निधीचा चुराडा होत असताना दुसरीकडे नाट्यगृह नेमकं कधी खुले होईल? याची दस्तुरखुद्द नगरपालिका प्रशासनाही काही माहिती देता येत नाही. त्यामुळे पालिकेच्या या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या नाट्यगृहावर ११ वर्षात दुरुस्तीसाठी एकूण ६४ लाख ६८ हजार ७२८ रुपयांचा निधी खर्च करूनही नाट्यगृह अद्यापही बंद अवस्थेतच आहे.
सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी २००२ मध्ये उभारलेले स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह गेल्या १६ वर्षापासून बंद असल्याने नाट्य रसिकांसह स्वयंसेवी संस्थांची परवड सुरू आहे. हे नाट्यगृह खुले झाल्यानंतर सुरवातीची काही वर्षे वगळता नंतर नाट्यगृहाच्या डागडुजीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याने नाट्यगृहाच्या वास्तूवर अखेरची घटका मोजण्याची वेळ सध्या ओढवली आहे. नाट्यगृहाचा पडदा उघडण्यासाठी आजवर अनेक लोकप्रतिनिधींनी घोषणा केल्या; मात्र या घोषणांची प्रत्यक्षात पूर्तता न झाल्याने नाट्यगृह सद्यःस्थितीत शोभेची वस्तू बनली आहे. नगर प्रशासनाने दुरुस्तीच्या नावाखाली नाट्यगृहावर लाखो रुपयांची उधळण केली. २०१६ पासून नाट्यगृहाच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्ती कामामुळे आज ना उद्या नाट्यगृह खुले होईल, या आशेवर वर्षानुवर्षे पाणीच फेरल्याने आता तर नाट्यगृह खुले होण्याचा नादच सार्‍या खेडवासीयांनी सोडून दिला आहे. वर्षानुवर्षे बंद अवस्थेत असलेल्या नाट्यगृहामुळे स्वयंसेवी संस्थांसह कलाप्रेमींना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खासगी सभागृहांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सन २०१८ ऑक्टोबर महिन्यात वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत नगरविकास खात्याकडून प्राप्त झालेल्या २ कोटी रुपयांच्या निधीतून ८० लाख रुपयांचा निधी नाट्यगृहाच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात येणार होता. मात्र, या निधीचे नेमक काय झाले? याबाबत कुठेही तपशील मिळत नाही.
-----
चौकट
चार कोटीचा निधी मंजूर
या नाट्यगृहासाठी चार महिन्यांपूर्वी आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नातून नगरविकास विभागाकडून ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी बंद अवस्थेत असलेल्या नाट्यगृहाचा पडदा लवकरच उघडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नगर पालिकेच्या बांधकाम विभागाकडून हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे नाट्यरसिकांच्या या नाट्यगृहाबाबतचा पडदा उघडण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
------------
चौकट
दिवसा पार्किंग स्थळ

सद्यःस्थितीत दुरुस्तीअभावी नाट्यगृहाची पुरती पडझड झाली आहे. त्याचा कोणताही सांस्कृतिक वापर होत नाही. साहजिकच दिवसा हे ठिकाण गाड्या पार्क करण्याची हक्काची जागा बनली आहे. दिवस मावळताच हे नाट्यगृह मद्यपींचा अड्डा बनत आहे. यातून दिवसा पार्किंग अड्डा आणि सायंकाळनंतर मद्यपींचा अड्डा असा नाट्यगृहाचा वापर सध्या सुरू आहे.
---------
चौकट
नाट्यगृह दुरुस्तीच्या नावाखाली खर्च झालेली रक्कम
सन २०१२-१३- ३२ लाख ९५ हजार ६७८ रु
सन २०१४-१५- ११ लाख २ हजार ७ रु
सन २०१६-१७- १७ लाख २७ हजार ३५४ रु व ७९ हजार १९८ रु.
सन २०१७-१८ - १ लाख ७० हजार ७०३ रु
सन २०२०-२१ - ९३ हजार ७८८ रु.
------------

कोट
-rat२५p२८.jpg :
98497
उत्तमकुमार जैन
-----
कोकण ही सांस्कृतिक भूमी आहे. तिला साहित्यिक वारसा आहे. अनेक तरुण, मध्यमवर्गीय, साहित्यिक लेखक, कवी आज या मातीत उदयास येत आहेत; परंतु या ठिकाणी नाट्यकर्मींना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी माध्यमच उरलेले नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे नगर पालिकेने या नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ पावले उचलून नाट्यरसिकांना दिलासा द्यावा.
- उत्तमकुमार जैन, साहित्यिक
------------------
कोट
-rat२५p२९.jpg :
98498
विनय माळी
------
२००१ ते २००८ या आठ वर्षांत खेडमधील नाट्यरसिकांनी या नाट्यगृहात अनेक दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेतला. ज्येष्ठ रंगकर्मी स्व. डॉ. श्रीराम लागू, स्व. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचा जीवंत अभिनय खेडवासियांना अगदी जवळून अनुभवता आला. नाट्यकलाकारही या नाट्यगृहाची प्रशंसा करू लागले होते. नाटकांप्रमाणेच जादूचे प्रयोग, राजकीय पक्षांचे मेळावे, शाळा, महाविद्यालयांची स्नेहसंमेलने यासारख्या स्पर्धा या नाट्यगृहात पार पडू लागल्या होत्या; परंतु २००८ उजाडले आणि नाट्यगृहाला ग्रहण लागले. हे नाट्यगृह लवकरच सुरू व्हावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगर प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी
- विनय माळी, कलाकार
--------------
कोट
-rat२५p३०.jpg :
98499
वैभव खेडेकर
-------
नाट्यगृह मनसेच्या अजेंड्याचा विषय आहे. खेडच्या सांस्कृतिक चळवळीचा एक भाग आहे. चांगले काम न झाल्यामुळे २००८ ला सिलिंगचे प्लास्टर कोसळून नाट्यगृह बंद पडले. आम्ही नाट्यगृह सुरू करण्यासाठी भीक मांगो आंदोलन केले होते. त्यानंतर खेडवासीयांनी आम्हाला सत्तेत बसवले; परंतु राज्यात एकमेव आमची नगर पालिकेत सत्ता, राज्यातील विरोधी वातावरण यामुळे आम्हाला नाट्यगृह सुरू करण्यासाठी पुरेसा निधी प्राप्त झाला नाही. शासनाच्या निर्णयाप्रमाणे शासकीय निधी खर्ची पडलेल्या इमारतीवर पुन्हा ३० वर्षांच्या आतच या ठिकाणी शासकीय निधी खर्च करता येत नाही. तरीदेखील आम्ही आमच्या कार्यकाळात या ठिकाणी ८० लाखांचा निधी आणला; परंतु खूप वर्षे खितपत पडलेल्या वास्तूंचे पुनर्निर्माण करण्यासाठी आम्हाला निधी कमी पडला तर तांत्रिक बाबतीतदेखील अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या; परंतु सद्यःस्थितीत नाट्यगृहाच्या इमारतीकरिता ४ कोटींचा निधी शासनस्तरावर मंजूर झालेला आहे. ही चांगली गोष्ट असून, निधी कोणीही आणावा; परंतु नाट्यगृह लवकरात लवकर सुरू व्हावे.
- वैभव खेडेकर, मनसे नेते व माजी नगराध्यक्ष, खेड
-------------
कोट
-rat२५p३१.jpg :
98500
सतीश चिकणे
-------
ज्यांनी नाट्यगृहासाठी भीक मांगो आंदोलन केले. पाच वर्षे नगराध्यक्षपद भूषवले. त्यांनी नाट्यगृह सुरू होण्यासाठी काहीच केले नाही. खेडच्या जनतेची फक्त दिशाभूल केली आहे. आमदार योगेश कदम यांनी नाट्यगृहासाठी नगरविकास खात्याकडून नाट्यगृहाच्या इमारतीसाठी ४ कोटी रुपये मंजूर करून आणले असून, कोकणातील भव्यदिव्य अशी नाट्यगृहाची इमारत उभी राहणार आहे.
- सतीश चिकणे, खेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com