संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त पट्टा
संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

पान ५ साठी, संक्षिप्त


ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ३० ला मार्गदर्शन
रत्नागिरी : रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन येत्या ३० एप्रिलला केले आहे. यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ राजशेखर मलुष्टे मार्गदर्शन करणार आहेत. रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांचा एप्रिल २०२३ चा सामूहिक वाढदिवस कार्यक्रम याच दिवशी होणार आहे. ३० ला दुपारी ४.३० वाजता ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिवाजीनगर येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा लाभ संघाच्या सभासदांव्यतिरिक्त शहरातील अन्य ज्येष्ठ नागरिकांनीही घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले आहे.

९८५२५
कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभा
युवाब्रह्मच्या छंदवर्गाला प्रतिसाद

रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या युवाब्रह्म या युवक वर्गाने पाच ते दहा वर्षे या वयोगटातील सर्व ज्ञाती बांधवातील मुलांसाठी नाचणे रोड यथील गोखले भवन या नव्या वास्तू मध्ये छंद वर्ग आयोजित केला. या छंद वर्गामध्ये मुलांना मराठी व संस्कृत गाणी श्लोक, स्तोत्र, नृत्य, हस्तकला, चित्रकला, चटपटीत खाऊची पाककला, विविध आणि विस्मरणात गेलेले खेळ, वृक्षवल्ली मध्ये फेरफटका, योगवर्ग, पौष्टिक खाऊची मेजवानी अशा इतर अनेक गोष्टीचा समावेश करण्यात आला होता. लहान मुलांचा अतिशय उत्तम प्रतिसाद या शिबिराला लाभला. पालक आणि सर्व स्तरातून याचे कौतुक करण्यात आले. सुट्टीमध्ये मुलांसाठी उपयुक्त आणि बौद्धिक चालना देणारा असा उपक्रम या शिबिरातून राबवण्यात आला. लहान मुलांच्या विविध गुणदर्शन आणि छोटेखानी बक्षीस समारंभाने या शिबिराची सांगता झाली. समारोपावेळी कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक अनंत आगाशे, रविंद्र रानडे, सौ. आगाशे यांचे मार्गदर्शन लाभले. छंदवर्गला श्रीकांत ढालकर, सौ. माधुरी कळंबटे, गौरांग आगाशे, रवींद्र इनामदार, सिद्धी केळकर यांनी मार्गदर्शन केले.
छंद वर्गाच्या आयोजनासाठी आदिती भावे, किर्ती मोडक, दीप्ती आगाशे, श्रद्धा जोशी, देवदत्त पेंडसे, सुषमा पटवर्धन, ओमप्रकाश गोगटे, हर्षदा मुसळे, अपूर्वा मुसळे, श्वेता केळकर, नीला केळकर, नीलम जोशी या युवाब्रह्मच्या प्रतिनिधींनी मेहनत घेतली. यापुढील छंद वर्गाची तारीख लवकरच कळविण्यात येईल असे युवाब्रह्म च्या वतीने सांगण्यात आले